नवी दिल्ली : गुजरात विधानसा निवडणूक ही भाजपसाठी आव्हानात्मक आहे. लोकांमध्ये जीएसटी आणि नोटबंदीमुळे प्रचंड राग आहे. त्यामुळे भाजपसाठी ही निवडणूक नव्हे तर, अडचणीचा सामना असल्याचे मत भाजपचे नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी व्यक्त केले आहे.
कॉंग्रेस नते मनीष तिवारी यांच्या एका पुस्तकावर आयोजित परिसंवादावेळी सिन्हा बोलत होते. या वेळी शत्रुघ्न सिन्हा यांनी आर्थिक विषयावर मत व्यक्त करताना सावध पवित्र घेतला. पण, मिष्कील टिप्पणीही केली. ते म्हणाले, एक वकील आर्थिक विषयावर भाष्य करू शकतो. जर एक टीव्ही अभिनेत्री मनष्यबळ विकासमंत्री होऊ शकते आणि एक 'चहावाला' जर ....... बनू शकतो तर, मी अर्थव्यवस्थेवर का बोलू शकत नाही? असा मिष्कील सवार सिन्हा यांनी व्यक्त केला.
अर्थात शत्रुघ्न सिन्हा यांनी कोणाचेही नाव घेणे टाळले. मात्र, त्यांच्या बोलण्याचा रोख हा अर्थमंत्री अरूण जेटली आणि माजी मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांच्याकडे होता. हे उपस्थितांच्या लगेच ध्यानात आले. पुढे बोलतान सिन्हा म्हणाले, मी पक्षाला आव्हान देत नाही. मात्र, भाजपच्या आणि देशाच्या विकासासाठी आणि फायद्यासाठी काही निरिक्षणे जरूर नोंदवू शकतो. नोटबंदी आणि जीएसटीमुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड राग आहे. सध्याची स्थिती पाहता गुजरातमध्ये भाजपला किती जागा मिळती हे सांगता येणार नाही, असेही सिन्हा म्हणाले.