गोव्याच्या किनाऱ्यावर लग्न करण्याचं स्वप्न बघताय; मग ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची

Beach Wedding in Goa: प्रत्येकाची लग्न करण्याची स्वप्न निरनिराळी असतात. त्यातच आता डेस्टिनेशन वेडिंगचा ट्रेंड येत आहे.  

Updated: May 28, 2023, 01:19 PM IST
गोव्याच्या किनाऱ्यावर लग्न करण्याचं स्वप्न बघताय; मग ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची title=
Now pay Rs 1L to seek coastal body nod for beach wedding in goa

Goa Beach Wedding: लग्न (Indian Wedding) हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असतो. लग्नाच्या आठवणी जपून राहाव्यात यासाठी प्रत्येक जण आपले लग्न खास व्हावे यासाठी धडपडत असतो. हल्ली बाजारातही लग्नाचे वेगवेगळे ट्रेन्ड येत आहेत. त्यातीलच एक ट्रेन्ड म्हणजे बीच वेडिंग (Beach Wedding In India). भारतात बीच वेडिंगसाठी गोवा (Goa) हे सगळ्यांचे आवडते डेस्टिनेशन आहे. मात्र, आता गोव्याच्या किनाऱ्यावर (Destination Wedding) लग्न करण्याचं स्वप्न बघणाऱ्यांसाठी निराशाजनक बातमी आहे. गोव्यात किनाऱ्यावर लग्न करणे आता महाग होणार आहे. गोवा कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीने अर्जाचे शुल्क वाढवून दुप्पट केले आहे. (Beach Wedding in Goa)

परवानगीसाठी शुल्क वाढले 

गोव्याच्या किनाऱ्यावर लग्न करण्याची परवानगीचा अर्ज करताना आता एक लाख रुपयांचे शुल्क भरावे लागणार आहे. १ लाख रुपये भरल्यानंतरच जोडप्यांना किनाऱ्यावर लग्न करण्याची परवानगी मिळणार आहे. एप्रिल २०२०मध्ये प्राधिकरणाने १० हजार रुपयांनी वाढवून ५०, ००० रुपये इतके वाढवले होते. मात्र, आता प्राधिकरणाने पुन्हा वाढवलेल्या दरानुसार, आता १ लाख रुपये भरावे लागणार आहेत. त्यानंतर संपूर्ण पाच दिवसांसाठी तिथे कार्यक्रम करण्याची परवानगी तुम्हाला मिळणार आहे. 

लातुरमध्ये खळबळ! तलावाशेजारी सापडला मानवी हाडांचा सांगाडा; ४ महिन्यांपूर्वीच्या 'त्या' घटनेशी संबंध?

अर्जांमध्ये वाढ

प्राधिकरणाने वाढवलेल्या शुल्कानुसार, आता तुम्ही पाच दिवस बुकिंग करु शकणार आहात. हे दर किनाऱ्यावर लग्न करण्यांबरोबरच अन्य कार्यक्रमांनाही लागू असणार आहेत. जीसीजेडएमएच्या अधिकाऱ्यांनुसार, हिवाळ्यात व उन्हाळ्याच्या महिन्यात दरवर्षी अर्जांमध्ये वाढ होत असते. त्यामुळं या अर्जांची तपासणी करण्यातच प्राधिकरणाचा वेळ जातो व कामदेखील वाढते. अनेकदा अर्जांमध्ये एक हजार व्यक्तींसाठी ८०० वर्गमीटरच्या क्षेत्रांपर्यंतची जमीन देण्याची परवानगी काही जण मागत आहेत. 

हे दोन महिने लग्नासाठी परफेक्ट

डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात किनाऱ्यावर लग्न आणि इतर कार्यक्रमांच्या आयोजनासाठी परवानगी मागतात. अनेकजण याच महिन्यात गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावर लग्न करण्याला पसंती देतात. 

दक्षिण गोव्याला अधिक पसंती

गोव्यात लग्न करण्यासाठी लोक दक्षिण गोव्याला जास्त पसंती देतात. शांत व सुंदर समुद्र असल्याने लोकांचा कल तिथे अधिक आहे. त्तोर्दा, वेलसाओ, कैवेलोसिम, मोबोर, बेनाउलिम, वर्का, बोगमालो और राजबागा हे किनारे लोकांच्या अधिक आवडीचे आहेत. उत्तर गोव्यात अश्वम, मिरामार आणि वॅगुनिममध्ये लग्न करण्यासाठी अधिक परवानगीचे अर्ज आले आहेत. लग्न समारंभ आणि इतर कार्यक्रमांसाठी किनाऱ्यालगतचे हॉटेल बुक केले जातात.