अहमदाबाद: लोकसभा निवडणुकीत भाजपने मिळवलेल्या देदिप्यमान यशानंतर देशभरात पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून आनंदोत्सव साजरा केला जात आहे. मात्र, या सगळ्यात अहमदाबादमधील मोदींचा एक वर्गमित्र चांगलाच चर्चेत आला आहे. ७० वर्षांचे जासूद पठाण हे नरेंद्र मोदी वडनगरमधील शाळेत शिकत असताना त्यांचे वर्गमित्र होते. जासूद पठाण यांना अजूनही या मैत्रीची आठवण असल्याने ते नेहमी मोदींच्या भल्यासाठी देवाकडे प्रार्थना करत असतात.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीपूर्वीही त्यांनी नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान व्हावेत, यासाठी नवस बोलला होता. लोकसभा निवडणुकीच्या गुरुवारी जाहीर झालेल्या निकालांवेळी त्यांची ही ईच्छा पूर्ण झाली. त्यामुळे आता जासूद पठाण हा नवस फेडण्यासाठी अजमेरच्या दर्ग्यात जाणार आहेत. मोदींना उत्तम आरोग्य आणि यश मिळावे यासाठी आपण रोजा ठेवला आहे. मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान होणार असून देवाने माझी पार्थना मान्य केल्याचे पठाण यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीतील 'हा' विजयी उमेदवार देणार राजीनामा
पठाण यांच्या व्यतिरिक्त मोदींचे आणखी एक वर्गमित्र नागजी देसाई यांनी हटकेश्वर मंदिरात मोदींच्या यशाबद्दल यज्ञ केला. देसाई यांनी २०१४ लोकसभा निवडणुकीत ८० किलो मिठाई वाटली होती.
लोकसभेच्या एकूण ५४२ जागांपैकी एनडीएला ३५१ तर यूपीएला ९१ जागा मिळाल्या. यामध्ये भाजप व काँग्रेसला अनुक्रमे ३०३ आणि ५२ जागा मिळाल्या. त्यामुळे भाजपने पुन्हा एकदा एकहाती सत्ता काबीज करण्याची किमया करून दाखवली आहे. तर नरेंद्र मोदी हे पाच वर्षांची टर्म पूर्ण करून पुन्हा बहुमताने सत्तेत येणारे पहिले बिगरकाँग्रेसी पंतप्रधान ठरले आहेत. यापूर्वी पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी या दोन नेत्यांनाच अशी कामगिरी जमली होती.
VIDEO : पाच मतं मिळाल्यानंतर हमसून हमसून रडला उमेदवार