Mahakumbh 2025 Monalisa : सोशल मीडियावर कोणतीही गोष्ट ही लगेच व्हायरल होते. त्यात सध्या चर्चेचा विषय हा प्रयागराजमध्ये सुरु असलेला महाकुंभ 2025 मेळावा. या मेळाव्यातील अनेक व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यापैकी सगळ्यात जास्त व्हायरल होणारी कोणती गोष्ट म्हणजे इंदूरची मोनालिसा. मोनालिसा ही महाकुंभ 2025 मध्ये माळा विकण्यासाठी आली. त्यानंतर तिच्या सुंदर डोळ्यांमुळे नेटकरी तिची स्तुती करत होते. तर अनेक लोक तिच्यामागे फोटो आणि व्हिडीओ शूट करण्यासाठी धावताना दिसले. या सगळ्यात आता मोनालिसाचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत मोनालिसा सांगताना दिसली की फोटो काढायला आलेल्या लोकांनी तिच्या भावावर हल्ला केला.
मोनालिसाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओत मोनालिसा सांगताना दिसली की 'काही पुरुष माझ्याकडे हे सांगत आले की माझ्या वडिलांनी त्यांना माझ्यासोबत फोटो काढण्यासाठी इथे पाठवलं आहे. मी त्यांना नकार दिला आणि त्यांना सांगितलं की माझ्या वडिलांनी पाठवलं असेल तर त्यांनी त्यांच्याकडे जावं. मी फोटो काढणार नाही. मी घाबरले होते, कारण इथे कोणीच नव्हतं. कोणीही काहीही करु शकत होतं. त्यात इथे लाईट देखील नव्हती. तरी सुद्धा जबरदस्तीनं काही लोकं टेन्टमध्ये शिरले. तितक्यात माझे वडील आले आणि त्यांनी विचारलं काय झालं. संपूर्ण प्रकरणाविषयी सांगितल्यानंतर माझ्या वडिलांनी सांगितलं की त्यांनी त्या पुरुषांना पाठवलंच नाही आणि ते त्यांच्यावर ओरडू लागले. त्यांना प्रश्न विचारू लागले की जबरदस्ती ती माझ्या टेन्टमध्ये कसे आले.'
याविषयी सांगत मोनालिसानं खुलासा केला की या सगळ्यामुळे माझा भाऊ चिडला आणि त्या लोकांचा फोन खेचून घेऊ लागला जेणे करून तो फोटो डिलीट करु शकेल. तितक्यात त्याच्यावर 9 लोकांनी हल्ला केला.
प्रयागराज महाकुंभ में माला बेचने आई बंजारा घुमंतू समुदाय की बेटी मोनालिसा और उनके परिवार पर हुआ हमला बेहद निंदनीय है। यह घटना प्रशासन की विफलता और खानाबदोश-घुमंतू समुदायों की सुरक्षा में सरकार की उदासीनता को दर्शाती है। दोषियों पर कड़ी कार्रवाई हो! @dgpup pic.twitter.com/QNPjBy995M
— Hansraj Meena (@HansrajMeena) January 22, 2025
मोनालिसाच्या लोकप्रियतेविषयी बोलायचं झालं तर तिला खरी लोकप्रियता ही एका इन्फ्लुएन्सरनं शेअर केलेल्या महाकुंभ 2025 मधील एका व्हिडीओमुळे मिळाली. त्यानंतर तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले. त्यात तिचा एक मेकअप केल्याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.