मुंबई : आसाम - मिझोरम सीमा वाद (Assam Mizoram Land Dispute) वाढत असताना मिझोरममध्ये इंधनाची समस्या (Mizoram Stares At Fuel Shortage) समोर आली आहे. मिझोरम सरकार (Mizoram Government) ने महत्वाचा निर्णय घेतला आहे. वाहनांना एका निश्चित स्वरूपात पेट्रोल आणि डिझेल मिळणार आहे. मिझोरममधील इंधनाची कमतरता नॅशनल हायवे 306 (National Highway- 306 Closed) बंद असल्यामुळे उद्भवला आहे.
मिजोरम सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार, 12, 8 आणि 6 चाकी वाहनांना 50 लीटर इंधन मिळणार आहे. मीडियम मोटर व्हीकल सारख्या पिकअप ट्रकला 20 लीटर इंधन मिळणार आहे. यासोबतच स्कूटरला 3 लीटर तर बाइकला 5 लीटर आणि कारला 10 लीटर इंधन मिळणार आहे.
आसामसोबत सीमा वाद सुरू आहे. या वादाचा परिणाम मिझोरममध्ये पोहोचणाऱ्या अन्नपदार्थ आणि इतर गोष्टींवर होत आहे. सगळ्या पेट्रोल पंपांना आदेश देण्यात आलेत की, मापातच वाहनांना इंधन द्यावं.
मिझोरम सरकारने आदेश दिले आहेत की,कुणालाही कंटेनरमध्ये पेट्रोल अथवा डिझेल भरू दिलं जाणार नाही. जे वाहन पेट्रोल पंपावर येईल त्यालाच इंधन दिलं जाईल. ज्यामुळे इंधनाचा काळाबाजार रोखला जाईल.