Trending Video : उंच इमारतीत खाली-वर ये-जा करण्यासाठी लिफ्टचा (Lift) वापर केला जातो. रुग्णालयातही रुग्णाला एका मजल्यावरुन दुसऱ्या मजल्यावर नेण्यासाठी लिफ्टचा वापर होतो. पण कधी कधी हीच लिफ्ट अपघाताचं कारण ठरू शकते. असाच एक धक्कादायक व्हिडिओ (Video) सध्या सोशल मीडियावर (Social Media) मोठ्याप्रमाणावर व्हायरल (Viral) होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्या अंगाचाही थरकाप उडेल.
व्हायर होणाऱ्या व्हिडिओत काय?
व्हायरल होणारा व्हिडिओ एका रुग्णालयातील (Hospital) आहे. या व्हिडिओत दोन कर्मचारी एका रुग्णाला स्ट्रेचवरुन घेऊन जाताना दिसतायत. स्ट्रेचर घेऊन कर्मचारी लिफ्टच्या दारापाशी थांबतात, लिफ्टचा दरवाजा उघडतो. एक कर्मचारी लिफ्टचा आत जातो आणि स्ट्रेचर आतमध्ये खेचतो, तर दुसरा कर्मचारी बाहेरुन स्ट्रेचर ढकलताना दिसतोय. स्ट्रेचर अर्ध आत आणि अर्ध बाहेर असताना अचानक लिफ्ट सुरु होते आणि खाली जाते. बाहेरचा कर्मचारी स्ट्रेचर सोडून देतो. धक्कादायक म्हणजे लिफ्टचा दरवाजा बंद न होताच लिफ्ट सुरु होते.
Ye kaise hua ?
Pray that the patient and staff are safe ?
Unsafe #Elevator pic.twitter.com/wF9k3DPlz0
— Rupin Sharma (@rupin1992) October 11, 2022
स्ट्रेचरवरचा रुग्ण आणि आतला कर्मचारी दोघंही लिफ्टमध्ये असल्याचं या व्हिडिओत दिसतंय. या दुर्घटनेत रुग्ण आणि त्या कर्मचाऱ्यासोबत काय झालं याची माहिती मिळू शकलेली नाही. 17 सेकंदाचा हा व्हिडिओ अंगाचा थरकाप उडवणारा आहे. रुग्ण आणि तो कर्मचारी सुखरुप असेल अशी प्रार्थना काही युजर्सने हा व्हिडिओ पाहून केला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ आयपीएस अधिकारी रुपीन शर्मा यांनी शेअर केला आहे.