LIC New Insurance Policy: जर तुम्हीही गुंतवणूकीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. सध्या गुंतवणूकीचे पर्यायही वाढताना दिसत आहेत. त्यामुळे अशा काही गुंतवणूकीच्या पर्यांयांपैंकी एक म्हणजे एलआयसीच्या गुंतवणूकीची योजना (LIC Scheme). आपल्या सर्वांच वाटतं की आपणं जिथे कुठे गुंतवणूक करू त्यातून आपल्याला चांगला नफा (profit) मिळेल आणि तोही फार सुरक्षित असेल. अशावेळी तुम्ही एलआयसीच्या योजनेत गुंतवणूक करू शकता. या योजनेतून तुम्हाला फार जोखीम नाही. त्यातून तुम्ही चांगल्याप्रकारे नफाही कमवू शकता. खरं म्हणजे छोट्या गुंतवणूकदारांसाठी हा खूप चांगला पर्याय आहे. तेव्हा जाणून घेऊया की LIC च्या या योजनेतून तुम्हाला नक्की कसा आणि किती फायदा होऊ शकतो. तुम्ही रोज 250 रुपये गुंतवून 54 लाख रुपयांचा फॅट फंड या योजनेतून बनवू शकता.
LIC ने एक उत्तम योजना गुंतवणूकदारांसाठी आणली आहे. ही योजना नॉन लिंक्ड (non - linked scheme) आणि खूप जास्त फायदेशीर आहे. या योजनेतून गुंतवणूकदाराला मोठी रक्कम मिळते एवढेच नाही तर जर एखाद्या अपघातामुळे योजनाधारकाचा मृत्यू झाला तर अशा परिस्थितीत कुटुंबाला आर्थिक मदतही मिळते. गुंतवणूकदारांना त्यांच्या इच्छेनुसार प्रीमियमची रक्कम आणि कालावधी निवडण्याचा अधिकार आहे.