मुंबई : Knowledge News : 21 व्या शतकातील आपण लहानपणापासूनच कीबोर्डच्या सानिध्यात आहोत. कॉम्प्युटरची सवय आपल्या सगळ्यांनाचा आहे. त्यामुळे कीबोर्डवर आपण ज्या कंमाड देतो. त्यानुसार गोष्टी ऑपरेट होतात. या कीबोर्डवर छापलेली A ते Z पर्यंतची अक्षरं एका रांगेत नसतात, ती किबोर्डवर अस्तव्यस्त असतात. असं का असतं. हे तुम्ही कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय का? चला तर जाणून घेऊ या...
कीबोर्डचा इतिहास टाइपरायटरशी संबधीत आहे. म्हणचे कॉम्प्युटर कीबोर्ड येण्याआधी QWERTY Format चालत असे. 1968 साली क्रिस्टोफर लेथम शॉल्स यांनी टाइपराइटरचा शोध लावला. त्यांनी आधी ABCD फॉरमॅटवर किबोर्ड बनवला. परंतू टाइप करताना त्यांना जेवढ्या गतीच्या आणि सोप्या पद्धतीने टाइपिंगची अपेक्षा होती. तेवढी ती होत नव्हती.
ABCD टाइपच्या कीबोर्डमुळे टाइपराइटरवर लिहने कठिण झाले. मुख्य कारण म्हणजे त्याचे बटन इतके जवळ होते की, गतीने टाइपिंग करणे अवघड होत होते.
दुसरं म्हणजे, काही इंग्रजी अक्षरांचा वापर खूप जास्त होतो जसे की, E,I,S,M होय या तसेच काही शब्दांची खूपच कमी गरज असते जसे की, Z,X इत्यादी होय.
अशातच जास्त वापरात येणाऱ्या अक्षरांसाठी संपूर्ण कीबोर्डवर बोटं फिरवावी लागत असत त्यामुळे टाइपिंग देखील स्लो होत होते. या अडचणीवर उपाय शोधण्यासाठी अनेक प्रयोग करण्यात आले. त्यानंतर QWERTY Format किबोर्ड 1870 मध्ये अस्तित्वात आला. या कीबोर्डमध्ये जास्त वापर आणि गरजेचे बटन कीबोर्डच्या मध्ये ठेवले.
हे मॉडेल लोकांच्या जास्त पसंतीस पडले. तेव्हापासून सर्व जगभर तेच कीबोर्ड वापरात आहे.