मुंबई : नोटांच्या माध्यमातून देखील कोरोनाचे संसर्ग होतो का? देशात आणि जगात कोट्यावधी लोकं आहेत ज्यांना याबाबत शंका आहे. लोकांची ही शंका दूर करण्यासाठी एक अभ्यास केला गेला आहे. हा अभ्यास ब्लूमबर्गने प्रकाशित केला आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार बँक ऑफ इंग्लंडला असे लक्षात आले आहे की, नोटा किंवा रोख रकमेद्वारे कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका कमी आहे.
या अभ्यासादरम्यान असं लक्षात आलं की, कोरोना झालेला व्यक्ती जर शिंकला तर त्या नोटेवर कोरोनाचे विषाणू एक तासभर राहतात. त्यानंतर ५ टक्के पेक्षा कमी विषाणू शिल्लक राहतात. अभ्यासादरम्यान असेही आढळले की, नोटा सहसा पर्समध्ये ठेवल्यामुळे अशी शक्यता तुलनेने कमी असते. कोरोना-संक्रमित व्यक्तीची नोटांना स्पर्श होण्याची शक्यता कमी असल्याने कोरोना संसर्ग होण्याची शक्यता कमी आहे.
ब्लूमबर्गच्या अहवालात असेही नमूद केले आहे की, लोकांच्या नियमित संपर्कात येणाऱ्या इतर वस्तूंच्या तुलनेत नोटेवरील कोरोना व्हायरसचे अस्तित्व कमी असल्याचे दिसून आले आहे. अहवालात असे म्हटले आहे की, कोरोना संक्रमित व्यक्तीने नोटांना स्पर्श केल्यानंतर ही त्यातून कोरोना संसर्ग होण्याचा धोका कमीच असतो.
बँकेच्या रोख रकमेवर कोरोना विषाणूचे फारसे अस्तित्व नसल्याचे अहवालात म्हटले आहे. जरी ते असले तरीही, नंतर त्याचे लक्षणे क्वचितच दिसतात.