Indian Railways Rules : तुम्हीही रेल्वेने प्रवास केला असेल.अनेक प्रवासी जास्त करुन रेल्वे प्रवासाला प्राधान्य देताना दिसतात. लांबचा प्रवास असो की लोकलचा प्रवास. रेल्वेने प्रवास त्रासदायक ठरत नाही आणि हा प्रवास करणे फायदेशीर मानले जाते. तुम्हीही रेल्वेमधून प्रवास केला असेल. पण तुम्हाला माहित आहे का की रेल्वेत प्रवासादरम्यान असे 5 मोठे गुन्हे घडतात, जे आपण चुकूनही करु नये, अन्यथा मोठ्या दंडासोबतच जेलची हवा खावी लागू शकते.
रेल्वेमध्ये तुम्ही ज्या डब्याचे तिकीट काढले आहे, त्याच डब्यातून प्रवास करावा. तुम्ही तसे न करता उच्च श्रेणीच्या डब्यातून प्रवास करताना आढळल्यास, तुमच्यावर रेल्वे कायदा (Indian Railways Penalty Rules) अंतर्गत कारवाई केली जाऊ शकते. अशा प्रकरणांमध्ये, तुमच्याकडून लांब अंतरासाठी पूर्ण भाडे आणि 250 रुपये दंड आकारला जाऊ शकतो.
जर तुम्ही ऑनलाइन वेटिंग तिकीट घेतले असेल आणि ते आपोआप रद्द झाले असेल, तर तुम्ही अशावेळी रेल्वेने प्रवास करु शकत नाही. असे करताना आढळल्यास, TTE तुम्हाला विना तिकीट समजेल आणि प्रवासाचे संपूर्ण भाडे आकारण्याबरोबरच 250 रुपये दंड आकारु शकतो. यासोबतच TTE तुम्हाला पुढच्या स्टेशनवर उतरवू शकतो.
रेल्वेतील तिकीट केवळ अधिकृत काउंटर किंवा अधिकृत एजंटद्वारे विकली जात आहेत. जर एखादी व्यक्ती परवानगीशिवाय रेल्वे तिकीट विकताना आढळली (Indian Railways Penalty Rules), तर त्याच्याविरुद्ध रेल्वे कायद्याच्या कलम-143 अंतर्गत कारवाई होते. त्या व्यक्तीला अटक केली जाऊ शकते. दोषी सिद्ध झाल्यास आरोपीला 10,000 रुपये दंड आणि 3 वर्षांची शिक्षा होऊ शकते.
रेल्वेच्या परिसरात परवानगीशिवाय वस्तू विकणे किंवा फेरी मारणे हा दंडनीय गुन्हा आहे. असे केल्याने, रेल्वे कायद्याच्या (Indian Railways Penalty Rules) कलम 144 अंतर्गत तुमच्याविरुद्ध खटला सुरु केला जाऊ शकतो. दोषी सिद्ध झाल्यास 1 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 2 हजार रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. तुमच्या सामाजिक प्रतिष्ठेवर डाग लागेल, ते नुकसान वेगळेच.
रेल्वेतून प्रवास करताना छतावर बसून प्रवास करणे बेकायदेशीर आहे. रेल्वेच्या छतावर प्रवास करताना प्रवासी पकडले गेल्यास त्याच्यावर रेल्वे कायद्याच्या कलम-156 अंतर्गत कारवाई होऊ शकते. अशा प्रकरणांमध्ये 3 महिने तुरुंगवास आणि 500 रुपयांपर्यंत दंडाची शिक्षा भोगावी लागेल. त्यामुळे रेल्वे प्रवासात चुकूनही अशी चूक करु नका.