हिंदी महासागरातील तापमानवाढीचा भारताला मोठा धोका

अतिवृष्टी, हिमनद्या वितळतील,भारतासाठी धोक्याची घंटा

Updated: Aug 10, 2021, 08:46 AM IST
हिंदी महासागरातील तापमानवाढीचा भारताला मोठा धोका title=

मुंबई : जागतिक तापमानवाढीचा भारताला धोका असल्याचा इशारा IPCCच्या अहवालातून देण्यात आलाय. समुद्रपातळीत वाढ होऊन वारंवार पुराची शक्यता असल्याचंही या अहवालातून स्पष्ट करण्यात आलंय. पृथ्वीचं तापमान वाढल्यानं कुठले दुष्परिणाम जाणवतील याबाबत संयुक्त राष्ट्राकडून क्लायमेट चेंज अहवाल प्रसिद्ध करण्यात आलाय. त्यामध्ये येत्या काही दशकात समुद्रपातळीत वाढ, वारंवार पूर, उष्णतेच्या लाटा, कमी वेळात अधिकचा पाऊस आणि त्याचवेळी त्याच्याच जवळ असलेल्या भागात भीषण दुष्काळी परिस्थितींमध्ये वाढ होणारेय. त्याचसोबत 21 व्या शतकात उष्णतेचं प्रमाण वाढण्याचे आणि थंडीचं प्रमाण कमी होण्याचा अंदाज आहे. (Indian Ocean warming at faster pace, India to witness increased heat waves, flooding: Report)

हिंदी महासागराचत अन्य समुद्रांपेक्षा जलद गतीनं तापमानवाढ होतेय. येत्या काही दशकांत भारतात उष्णतेच्या लाटा येतील आणि पूरपरिस्थितीलाही तोंड द्यावे लागेल, असा इशारा संयुक्त राष्ट्रांच्या ताज्या जागतिक अहवालात देण्यात आला आहे. पृथ्वीचे तापमान वाढत असल्याने कोणकोणते जागतिक दुष्परिणाम संभवतील, याबाबतचा संयुक्त राष्ट्रांच्या ‘इंटरगव्हर्नमेन्टल पॅनेल ऑन क्लायमेट चेन्ज’ चा सहावा अहवाल ‘क्लायमेट चेंज २०२१ – दी फिजिकल सायन्स बेसिस’ सोमवारी प्रसिद्ध करण्यात आला. त्यात भारताबद्दल गंभीर इशारा देण्यात आलाय. हिंदी महासागराच्या तापमानवाढीमुळे समुद्रपातळीत वाढ होऊन किनारपट्टीच्या सखल भागांमध्ये वारंवार तीव्र पूरपरिस्थिती उद्भवेल, असं या अहवालात म्हटलं आहे. 

हे होणार बदल 

-'हिंदी महासागर तापमान वाढल्यानं समुद्रपातळी वाढणार'
- अतिवृष्टी, हिमनद्या वितळतील,भारतासाठी धोक्याची घंटा
- क्लायमेट चेंज अहवालात असा इशारा
- हिंदी महासागरातील तापमानवाढीचा भारताला मोठा धोका
- येत्या काही दशकात भारतात उष्णतेच्या लाटा आणि पूरस्थितीचा धोका
- वारंवार पूर येणार
- येत्या काही दशकात उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता
- जागतिक तापमानवाढीचा धोका
- उन्हाळा वाढणार, हिवाळा घटणार