cooking tips to cook perfect rice: जेवण बनवणं ही एक कला आहे ती प्रत्येकालाच जमते असं नाही. वरवर जेवण बनवणं तर सोप्प काम वाटत पण परफेक्ट जेवण सर्वानाच बनवता येतं असं नाही पोट भरण्यासाठी जेवण बनवणं तर सगळेच करतात पण त्यात ती मजा नसते जे जेवण आई बनवते किंवा एखादा शेफ बनवतो.. आपल्याला बऱ्याचदा हॉटेलमध्ये बनलेलं जेवण पाहून विशेषतः ताटात वाढलेला भात पाहून प्रश्न पडतो कि,एवढा परफेक्ट हा भात कसा शिजवतात जे आपण घरी का नाही शिजवू शकत.
जेवण बनवणं ही एक कला आहे. वरवर पाहता आपल्याला वाटतं कि आपण जेवण बनवू शकतो पण योग्य प्रमाण आणि पद्धत वापरून जेवण बनवणं प्रत्येकालाच शक्य होत नाही. यासाठी खूप वर्षांचा अनुभव कामी येतो.. तुमच्या बाबतीत बऱ्याचदा असं झालं असेल कि घरी तुम्ही भात बनवला असेल पण तरीही तुमचा भात सुट्टा किंवा परफेक्ट बनत नाही .. तांदूळ कितीही चांगला असला तरी तुम्ही बनवलेला भात नेहमीच चिकट होत असेल तर आता टेन्शन घेऊ नका.. तुमच्या याच त्रासावर उपाय म्हणून आज घेऊन आलोय परफेक्ट हॉटेल स्टाईल मोकळा आणि परफेक्ट राईस कसा शिजवायचा...