राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षाची निवडणूक कशी होते? कोण करतं मतदान?

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी अखेर मल्लीकार्जुन खरगे आणि शशी थरुर यांच्या लढत होणार आहे. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी दोन्ही नेत्यांनी अर्ज भरले.

Updated: Sep 30, 2022, 05:33 PM IST
राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षाची निवडणूक कशी होते? कोण करतं मतदान?

धनंजय शेळके, प्रतिनिधी, मुंबई: भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी अखेर मल्लीकार्जुन खरगे आणि शशी थरुर यांच्या लढत होणार आहे. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी दोन्ही नेत्यांनी अर्ज भरले. मल्लीकार्जुन खरगे हे गांधी घराण्याचे विश्वासून नेते समजले जातात. त्यामुळे गांधी कुटुंबियाचा खरगे यांना पाठिंबा असेल असं बोललं जातंय. तर शशी थरुर हे काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत लोकशाही हवी आणि अध्यक्षपदासाठी निवडणूक व्हावी असा आग्रह धरणा-या जी – 23 या गटाचे सदस्य आहेत.  
       
काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी मतदान कोण करतं ?
काँग्रेसच्या अध्यक्षपसाठी देशभरातील डेलीगेट्स मतदान करतात. देशात साधारण ९ हजार डेलीगेट्स आहेत. तर महाराष्ट्रात 553 डेलीगेट्स आहेत. डेलीगेट्स म्हणज्ये ब्लॉकचा (तालुक्याचा) अध्यक्ष असतो. ब्लॉक अध्यक्ष किंवा तालुका अध्यक्ष हा संबधित तालुक्यातील बूथ प्रमुखांनी मतदान करुन निवडलेला असतो. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी होण्यासाठी कोणताही कोटा नसतो. ज्या उमेदवाराला सर्वाधिक मतदान होतं त्याला विजयी घोषित केलं जातं. उमेदवारी दाखल करण्यासाठी कमीत कमी 10 डेलीगेट्सचा पाठिंबा हवा असतो. प्रत्येक राज्याच्या राजधानीमध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडते.

  • काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी कोण मतदार आहेत ?

देशातील डेलीगेट्स मतदान करतात. देशात एकूण साधारणपणे 9 हजारांच्या आसपास डेलिगेट्स आहेत.

  • डेलिगेट्सची निवड कशी होते ?

प्रत्येक ब्लॉकमधून एक डेलिगेट्स निवडला जातो. ब्लॉकमधील बूथचे प्रमुख मतदानाने डेलिगेट्सची निवड करतात. महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाने साधारणपणे 553 ब्लॉक्स आहेत. त्यातून प्रत्येकी 1 म्हणजे 553 डेलिगेट्सची निवड केलेली आहे.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x