शिमला / नवी दिल्ली : हिमाचल प्रदेशमधील ६८ जागांमधील निकाल भाजपासाठी आनंददायक आहेत. पण पहाडी राज्यात पार्टीला एक जोरदार धक्का बसू शकतो. सुजानपुर येथे भाजपाचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार प्रेम कुमार भुवल आपले प्रतिस्पर्धी असलेल्या कॉंग्रेसच्या राजेंद्र राणापेक्षा मागे आहेत.
विशेष म्हणजे, धूमल यांना धोबीपछाड देणारे राजेंद्र राणा त्यांचे 'राजनितिक शिष्य' होते. जर धूमल यांना हार पत्करावी लागल्यानंतर पार्टीकडून मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण असणार ?
कधीकाळी धूमल यांच्याकडून राजकारण शिकणारे राजेंद्र या निवडणुकीत कॉंग्रेसकडून मैदानात उतरले. आपल्या 'पॉलिटीकल गुरू'ला हरविण्यासाठी त्यांनी पूर्ण जोर लावला आणि यामध्ये ते सफल होतानाही दिसत आहेत.
भाजपाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेम कुमार धूमल हरल्यानंतर पार्टीकडून केंद्रीय आरोग्यमंत्री आणि राज्य पार्टीतील प्रमुख चेहऱ्यांपैकी एक जे.पी नड्डा मुख्यमंत्री बनविले जाऊ शकतात.
१) पार्टीकडे दुसरा कोणता वरिष्ठ नेता नाहीए, ज्याला मुख्यमंत्री बनविले जाऊ शकेल.
२) महत्त्वाचे म्हणजे जे.पी. नड्डा भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्या आवडीचे मानले जातात.
३) त्यांना राज्य भाजपाचा अध्यक्ष बनविण्याचा मार्ग आधीच मोकळा झाला होता. जे.पी.नड्डा यांना अमित शहा यांच्या व्यतिरिक्त पंतप्रधान मोदी यांचेदेखील समर्थन आहे.