भोपाळ : जमिनीत घाम गाळून सोन्यासारखं अन्न पिकवणारा त्याच्या वाट्याला संकट फार आणि सुख कमीच. कधी अवकाळी संकट तर कधी कर्ज आणि इतर त्रास शेतकऱ्याची काही समस्यांमधून सुटका होत नाही. कितीही संकट आली तरी शेतकरी आपल्या जमिनीवरचं प्रेम कधीच कमी करत नाही.
जमीन ही त्याचा श्वास आणि जीव असते. लेकरांप्रमाणे आपल्या जमिनीचा सांभाळ तो करतो. मात्र तीच कुणी हिसकावली तर? डोळ्यात पाणी आणणार एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये शेतकरी हात जोडून विनवणी करतोय. अधिकाऱ्याच्या पायावर डोक ठेवतो आहे. वयोवृद्ध शेतकरी अधिकाऱ्याच्या पायावर डोक ठेवून विनंती करतो आहे. अत्यंत भावुक करणारा आहे. एक वृद्ध शेतकरी कलेक्टरच्या पायावर डोकं ठेवून विनंती करत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या वयोवृद्धच्या जमिनीवर काही गुंड लोकांनी कब्जा केला आहे. बद्रीलाल पत्नी, सून आणि आपल्या नातीसोबत कलेक्टरकडे आले होते. यावेळी ते वृद्ध मला माझी जमीन मिळवून द्या. तुम्ही जिल्ह्याचे देव आहात तुम्हीच हे करू शकता अशी विनंती हातापाया पडून केली.
वृद्धाने सांगितलं की मी यापूर्वी अनेकदा जनसुनावणीमध्ये याबाबत विनंती केली. मात्र प्रत्येकवेळी माझ्या विनंतीकडे दुर्लक्ष करण्यात आलं. जमीन मिळवण्यासाठी आंदोलन देखील केलं. पण त्यांना कोणतंही यश मिळालं नाही. 'म्ही माझ्या जिल्ह्याचे देव आहात तुम्हीच मला ती जमीन मिळवून देऊ शकता', असं म्हणत 80 वर्षांच्या वृद्ध व्यक्तीनं डेप्युटी कलेक्टरच्या पायावर डोकं ठेवलं.
2002 मध्ये काही गुंडानी खोटे कागदपत्र तयार करून ही जमीन हडपली होती. त्यानंतर अनेकवेळा ही जमीन मिळवण्याचा प्रयत्न केला. 2 गुंठ्याची ही जागा शेतीची असल्याचं वृद्धाचं म्हणणं आहे. वयोवृद्ध बद्रीलाल यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. वेळोवेळी प्रयत्न करूनही प्रशासन त्यांच्या विनंतीकडे दुर्लक्ष करत असल्याचंही त्याने म्हटलं आहे.