सरकारच्या या योजनेत गुंतवा ४ लाख, दर महिन्याला कमवा ५० हजार रुपये

तुम्ही बिझनेस करण्याच्या विचारात आहात का? तर तुमच्यासाठी ही बातमी कामाची आहे. 

archana harmalkar अर्चना हरमलकर | Updated: Dec 14, 2017, 01:24 PM IST
सरकारच्या या योजनेत गुंतवा ४ लाख, दर महिन्याला कमवा ५० हजार रुपये title=

नवी दिल्ली : तुम्ही बिझनेस करण्याच्या विचारात आहात का? तर तुमच्यासाठी ही बातमी कामाची आहे. ज्या बिझनेसबाबत आम्ही तुम्हाहा सांगतोय तो बिझनेस दररोजच्या वापरातील वस्तूंबाबत आहे. यातून तुम्हाला फायदाही चांगला होईल. या वस्तूंना बाजारांत नेहमी डिमांड असते. मोदी सरकार सध्या लघु आणि मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी नवनव्या योजना घेऊन येत आहे. तुम्हीही या योजनांचा फायदा घेत इनकम वाढवू शकता. 

गेल्या काही वर्षात ब्राँडेड बटर, पॅकेट दूध, दही, पॅक्ड पनीर, तूप आणि फ्लेवर्ड दूध यांची विक्री मोठ्या प्रमाणात वाढलीये. तुम्ही या पदार्थांचे मॅन्युफॅक्चरिंग युनिटही सुरु करु शकता. यासाठी सुरुवातीला तुम्हाला ४ लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. या प्रोजेक्टसाठी येणारा बाकी खर्च मुद्रा योजनेंतर्गत सरकारकडून दिला जाईल. एखादा बिझनेस सुरु करण्याआधी तुम्हाला संपूर्ण प्रक्रिया समजून घेणे गरजेचे आहे.

इतकी जागा गरजेची

ब्राँडेड बटर, पॅकेट दूध, दही, पॅक्ड पनीर, तूप आणि फ्लेवर्ड दूध यासाठीचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट सुरु करण्यासाठी तुमच्याकडे कमीत कमी १००० स्क्वे फूट जागा असणे गरजेचे आहे. जर तुमच्याकडे इतकी जागा नसेल तर तुम्ही भाड्यावरही जागा घेऊ शकता. 

लायसन्स

कोणत्याही पॅकेट फूड अथवा पॅक्ड पदार्थ तयार करण्यासाठी आरोग्य विभागाकडून लायसन्स मिळवणे गरजेचे असते. अनेक जण खाजगी पद्धतीने लायसन्स प्रक्रिया पार करतात. 

दुधाची सोय 

१००० स्क्वे फूट जागा आणि लायसन्स मिळवल्यानंतर दुधाचा एखादा पदार्थ तयार करण्यासाठी तुम्हाला दरदिवसाला ५०० लीटर दुधाचा सप्लाय गरजेचा असतो. यासाठी तुम्ही ग्रामीण क्षेत्रातील डेअरी बूथशी संपर्क करुन नियमित दुधाचा सप्लाय सुरु करु शकता. 

मशीनसाठी गुंतवणूक

दुधाशी संबंधित उत्पादने बनवण्यासाठी तुमच्याकडे मशीन्स असणे गरजेचे आहे. यासाठी तुमच्याकडे क्रीम सेपरेटर, पॅकिंग मशीन्स, बॉटल कॅपिंग मशीन, फ्रीज, कूलर, वेट करण्यासाठी मशीन, ट्रे शिवाय लहानमोठ्या मशीन्स लागतात. यासाठी तुम्हाला ५ लाख रुपये खर्च होणार.

खर्चाचे नियोजन

मिल्क प्लांटशी संबंधित कच्च्या मालासाठी तुम्हाला ७ लाख रुपयांचा खर्च येऊ शकतो. यात दूध, साखर, फ्लेवर आणि मीठ याशिवाय इतर गोष्टींचा समावेश आहे. याशिवाय स्टाफसाठी तुम्हाला महिन्याला कमीत कमी १ लाखापर्यंत खर्च येऊ शकतो. याप्रमाणे आतापर्यंत तुमचा खर्च १३ लाख रुपये इतका झाला. यासोबतच इतर खर्च जसे ट्रान्सपोर्ट, विजेचे बिल, टॅक्स, टेलिफोन बिल यासाठी ३ लाख रुपये खर्च होईल. एकूण मिळून १६ लाख रुपये खर्च येईल. 

गुंतवणूक गरजेची

याप्रकारच्या बिझनेसमध्ये तुम्हाला सुरुवातीला १६ लाख रुपये गुंतवणे गरजेचे आहे. मात्र यात तुम्हाला केवळ ४ लाख रुपये गुंतवावे लागतील. बाकी खर्च सरकारकडून मुद्रा योजनेंतर्गत टर्म कॅपिटल लोन आणि वर्किंग कॅपिटल लोनच्या रुपात मिळेल. युनिट सुरु झाल्यानंतर येणाऱ्या इनकममधून तुम्ही या खर्चाचे व्याज भरु शकता. 

दर महिन्याला ५० हजार रुपयांचा फायदा

दिवसाला ५०० लीटर दूध प्रोसेसिंग केल्यास तुम्ही दर महिन्याला १५ हजार लीटर दूध प्रोसेसिंग करता. याप्रमाणे एका वर्षात तुम्ही जितके उत्पादन तयार करता त्यातून वर्षाला ८४ लाख रुपयांचा टर्नओव्हर मिळेल. यात उत्पादनासाठीचा खर्च साधारण ७४ लाख रुपये आल्यासा तुम्हाला ८ लाख रुपये फायदा होईल. यातून टॅक्स वगळल्यास तुमच्याकडे ६ लाख रुपये उरतील. याचाच अर्थ तुमचे महिन्याचे उत्पन्न ५० रुपये इतके असेल. 

असे अप्लाय करा

तुम्हाला असा एखादा बिझनेस सुरु करायचा आहे तर यासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजनेंतर्गत कोणत्याही बँकेतून कर्ज मिळवू शकता. यासाठी संबंधित फॉर्ममध्ये नाव, पत्ता, बिझनेस पत्ता, शिक्षण, इनकम  आणि किती कर्ज हवे ही सगळी माहिती द्यावी लागेल. यासाठी लाभार्थाला कोणत्याही प्रकारचे प्रोसेसिंग शुल्क अथवा गॅरंटी फी द्यावी लागणार नाही.