निकालाआधी मोदींनी दिले असे संकेत

गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. 

archana harmalkar अर्चना हरमलकर | Updated: Dec 18, 2017, 10:54 AM IST
निकालाआधी मोदींनी दिले असे संकेत title=

नवी दिल्ली : गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. 

दोन्ही राज्यांमध्ये भाजपाने जोरदार आघाडी घेतलीये. गुजरातमध्ये भाजपला काँग्रेस टक्कर देताना दिसतेय. मात्र हिमाचलमध्ये भाजपने मुसंडी मारत काँग्रेसला जोरदार धक्का दिलाय.

गुजरातमध्ये भाजप सत्ता कायम राखणार असल्याचे चित्र दिसतेय. तर हिमाचलमध्ये सत्ताबदल होणार असल्याचे दिसतेय. यासगळ्यात मोदींनी निकालाआधीच विजयाचे संकेत दिले. 

 

संसदेत येत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी गाडीतून उतरले आणि त्यांनी विजयी निशाण दाखवलेय.