Crime News : उत्तर प्रदेशातील कुशीनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पहारेकरी घुर्हू यादव यांची पत्नी गीता देवी (50) गुरुवारी संध्याकाळपासून घरातून बेपत्ता होत्या. गीता देवी या पती, मुलगा आणि सुनेसोबत राहत होत्या. आई घरात नाही पाहून मुलाने बायकोला विचारल्यावर तिने सांगितलं की, कोणीतरी अज्ञात व्यक्ती दुचाकीवरून आला आणि सासू त्यांच्यासोबत निघून गेली. बराच वेळ होऊनही आई घरी परत न आल्याने कुटुंबीय काळजी करत होतं. अखरे त्यांनी गीता देवीचा शोध घेण्यास सुरुवात केली. नातेवाईकांना फोन करुन त्यांची विचारपूस केली. गावातही शोध घेतला पण त्यांची आई कुठेही दिसली नाही. अखरे मुलाने आई गीता देवी बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांकडे नोंदवली. मुलाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी शोध प्रक्रिया सुरु केली.
पोलिसांकडून कशीकडे गीता देवीचा शोध सुरु झाला. गीता देवीच्या घराची झाडाझडती घेतली असता शनिवारी सकाळी दरवाजाजवळील शौचालयाच्या टाकीत गीता देवी यांचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ पसरली. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांची गर्दी झाली. टाकीचे झाकण काढून मृतदेह बाहेर काढण्यात आलं. मृतदेहाचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर समजलं की महिलेचा मृत्यू डोक्याला मार लागल्याने झालाय. यानंतर गीता देवी या बेपत्ता नव्हत्या तर त्यांची हत्या झाली होती.
या प्रकरणी एसपी संतोष मिश्रा यांनी हत्येचा उलगडा करण्यासाठी एक टीम तयार केली होती. सून, मृताचा मुलगा आणि पती (घुरु यादव) चौकीदार यांची स्वतंत्रपणे चौकशी करण्यात आली. या चौकशीत तिघांच्या बोलण्यात बराच फरक आढळून आला. त्यानंतर मंगळवारी पोलिसांनी त्यांची कडक चौकशी केली आणि पती घुरू आणि सून गुडिया यांनी सर्व काही सांगून टाकलं. पोलिसांच्या चौकशीत सांगितलं की, दोघांचे म्हणजे सासरे आणि सुनेचे गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते.
'बेडरूमचे दार बंद होते, पण कुंडी लावली नव्हती. अचानक सासूने बेडरूमचा दरवाजा उघडताच तिच्या पायाखालची जमीन सरकली. महिलेचा पती आणि सून आक्षेपार्ह अवस्थेत पाहिलं. हे पाहून महिलेचा संयम सुटला आणि त्यांनी दोघांवर आरडाओरडा सुरू केला. सासूने धमकी दिली की, मी माझ्या मुलाला सगळं सांगेन. यानंतर जे घडलं ते खरंच खूप भीतीदायक होतं.'
यावरून तिघांमध्ये वाद सुरू झाला. सून आणि सासरे यांना यातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी कथा रचून गुरुवारी सायंकाळी गीता देवीच्या डोक्यात अर्धे जळालेल्या लाकडाने आणि विटाने वार करून तिची हत्या केली. घरातील शौचालयातील पाण्याच्या टाकीत मृतदेह लपवली. दरम्यान पोलिसांना अर्धा जळालेल्या लाकडाचा तुकडा सापडला, अर्धी वीट, एक लोकरीचा स्वेटर आणि रक्ताने माखलेली लोकरीची सलवार सापडली. याप्रकरणात पोलिसांनी मारेकरी सासरे आणि सुनेला तुरुंगात पाठवलंय.