Metro Couple Video : सर्वसामान्यांचा प्रवास सुखकर आणि आरामदायी होण्यासाठी मेट्रो, लोकल आणि मोनो रेल्वेची सोय करण्यात आली आहे. दिल्ली मेट्रो गेल्या काही महिन्यांपासून एका वेगळ्याच कारणाने बदनाम झाली आहे. सोशल मीडियावर दिल्ली मेट्रोमधील घाणेरडे आणि अश्लील कृत्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. दिल्ली मेट्रोमधील अजून एका कपलचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी चांगलेच संतापले आहेत. (couple kissing in delhi metro video viral on social media trending today)
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये धावत्या मेट्रोच्या दरवाज्याजवळ एक कपल एकमेकांच्या अगदी जवळ मिठीत असताना दिसून येतं आहे. ते फक्त एकमेकांना मिठी मारत नाही तर ते सार्वजनिक ठिकाणी किस करताना दिसून येत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, मेट्रोमध्ये प्रवाशांची गर्दी आहे. तरी या कपलने मनाची नाही तर जनाची तरी लाज बाळगाला पाहिजे होती. सगळ्या जगाचा विसर पडून ते दोघे एकमेकांच्या दुनियेत रमले होते. त्यांचे हे अश्लील चाळे मेट्रोमधील एकाने आपल्या कॅमेऱ्यात कैद केले.
दिल्ली मेट्रो प्रशासन आणि दिल्ली महिला आयोगाकडून वारंवार इशारा देऊनही मेट्रोमधील असे कृत्य करणाऱ्यावर वचक बसलेला दिसत नाही आहे. नवीन व्हिडीओमुळे नेटकरी संतापले असून आता मेट्रोमध्ये कपलने अश्लीलतेचा कळस काढल्याचं दिसतंय. कपलचं घृणास्पद आणि घाणेरडं कृत्य पाहून सोशल मीडियावर संतापाची लाट पसरली आहे.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर दिल्ली मेट्रोलाही टॅग केला आहे. या जोडप्यावर कठोरात कठोर कारवाई करण्याबाबतही मागणी केली आहे. एवढंच नाही तर हा व्हिडीओ बनवणाऱ्या लोकांवरही नेटकऱ्यांनी काही प्रश्न उपस्थिती केले आहेत. त्या कपलला थांबवण्याऐवजी त्यांचे असे व्हिडीओ व्हायरल करणे हे कितपत योग्य आहे असा प्रश्न यूजर्सने विचारला आहे.
Another emotional video of Anand Vihar #delhimetro (OYO).
Maybe we have forgotten that love is blind, people are not.#HBDAtlee #ISKCON #ICCRankings #JustinTrudeau #Shubh #MindfulLiving #PeaceDay #CHEN #TejRan #ShafaliVerma pic.twitter.com/EKSJs2p54d— Postman (@Postman_46) September 21, 2023
दिल्ली मेट्रोचे असे अनेक व्हिडीओ यापूर्वीही व्हायरल झाले होते . ज्यामध्ये कपल्स घाणेरडे कृत्य करताना दिसले आहेत. काही व्हिडीओमध्ये असंही दिसून आलं की, त्यांना लोकांनी अडवल्यावर त्यांनी त्यांच्याशी वाद घातला आहे. दरम्यान दिवसेंदिवस वाढत चालेल्या या कृत्यांवर आळा घालण्यासाठी दिल्ली मेट्रोकडून एक विशेष टीमही तैनात करण्यात आली होती. मात्र तरीही त्याचा परिणाम दिसून येत नाही आहे.