नवी दिल्ली : भारतात कोरोना रुग्णांच्या आणि मृतांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोना रुग्णांचा वाढता प्रादुर्भाव पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्वच राज्यांचे मुख्यमंत्री महत्त्वाचे निर्णय घेताना दिसत आहेत. तरी देखील भरताला ही साखळी तोडण्यात यश मिळत नाही. आज आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेली आकडेवारी धक्कादायक आहे. आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे जवळपास तब्बल ५ हजार नवीन रुग्ण आढळले आहेत.
आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत ४ हजार ९८७ नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे देशात एकूण कोरोना रुग्णांची संख्या ९० हजारांवर पोहोचली आहे. त्याचप्रमाणे २४ तासांत कोरोना व्हायरसने १२० जणांचा बळी घेतला आहे. आतापर्यंत देशात २ हजार ८७२ जणांना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत.
या राज्यांमध्ये कोरोनाचा सर्वाधिक कहर
महाराष्ट्र- १६०६
गुजरात- १०५७
तामिळनाडू - ४७७
दिल्ली - ४३८
राजस्थान २३३
उत्तर प्रदेश - २०१
मध्यप्रदेश - १९४
बिहार - १६१
पश्चिम बंगाल - ११५
जम्मू-काश्मीर - १०८
देशात आतापर्यंत ९० हजार ९२७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. ज्यामध्ये ५३ हजार ९४६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत देशात २ हजार ८७२ जणांना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत.