एनडीटीव्हीचे सहसंस्थापक प्रणव रॉय यांच्या घरावर सीबीआयचा छापा

सीबीआयने आज एनडीटीव्ही वृत्तवाहिनीचे सहसंस्थापक आणि कार्यकारी सहसंचालक प्रणव रॉय यांच्या घरावर छापा टाकला. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jun 5, 2017, 11:51 AM IST
एनडीटीव्हीचे सहसंस्थापक प्रणव रॉय यांच्या घरावर सीबीआयचा छापा  title=

नवी दिल्ली : सीबीआयने आज एनडीटीव्ही वृत्तवाहिनीचे सहसंस्थापक आणि कार्यकारी सहसंचालक प्रणव रॉय यांच्या घरावर छापा टाकला. 

 प्रणव रॉय, त्यांची पत्नी राधिका रॉय आणि एका खासगी कंपनीविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला. आयसीसीआय बँकेचे ४८ कोटी थकविल्याप्रकरणी प्रणव रॉय यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. 

सीबीआयकडून दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याच्या नोंदीनुसार प्रणव रॉय यांनी आरआरपीआर होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीसाठी बँकेचे ४८ कोटी रूपये थकवल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी दिल्ली, देहरादूनसह चार ठिकाणी छापे टाकण्यात आल्याची माहिती सीबीआय अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.