धर्मशाला : रॉयल एनफिल्डची ३५० सीसी बुलेट... तब्बल ३ तास २१ मिनिटे ५८ सेकंद... आणि १४३.४ किलोमीटरचा प्रवास... स्वप्नवत वाटणारा हा प्रवास पूर्ण करून दाखवलाय एका बीएसएफ जवानानं.... संजीवन असं या जवानाचं नाव आहे.
बुलेटच्या टेल लाईटवर बसून १४३.४ किलोमीटरचा पल्ला आणि तोही हॅन्डल न पकडता संजीवननं गाठलाय. संजीवन कांगडा जिल्ह्यातील कुठेडचा रहिवासी...
संजीवननं २००६ साली बीएसएफमध्ये असताना बाईक रायडिंग सुरु केली होती. बीएसएफच्या तडफदार टीमककडून संजीवननं मैसूर, जयपूर, चंदीगड, रेवाडी, गुडगाव, कोलकाता आणि मेरठ इथं बाईक रायडिंगचं प्रदर्शन केलंय.
१९ डिसेंबर १९७४ रोजी जन्मलेला संजीवन १९९३ साली बीएसएफमध्ये भरती झालाय. १७ ऑक्टोबर रोजी ३ तास २१ मिनिटे ५८ सेकंद हॅन्डल न पकडता त्यानं हा रेकॉर्ड कायम केलाय.
संजीवननं दिलेल्या माहितीनुसार, बीएसएफची मोटार सायकल टीम गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत आरके वाधवा परेड मैदानात अभ्यास करत होती. टीमनं १५ ऑक्टोबर रोजी मोटार सायकलवर साईड रायडिंग इव्हेंट ३ तास १३ मिनिट आणि २७ सेकंदात १०५.२ किलोमीटर चालवून एक रेकॉर्डही बनवला.