Ram Mandir : संपूर्ण देशात 22 जानेवारीला होणारा श्री रामलला प्राण प्रतिष्ठा सोहळा राष्ट्रीय उत्सव म्हणून साजरा केला जाणार आहे. देशभरात उत्साहाचं वातावरण असून आठवडाभर विविध कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आली आहे. सोहळ्यासाठी अयोध्या (Ayodhya) नगरी सजली आहे. या सोहळ्यासाठी देशभरातून विविध क्षेत्रातील दिग्गज अयोध्येत हजेरी लावणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योग आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी राज्यातील सर्व शिक्षण संस्थांना (School-College) सुट्टी जाहीर केली आहे. तसंच प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी राज्यात कुठेही मद्यविक्री होणार नाही. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी मंगळवारी हे आदेश जारी केले.
22 जानेवारीला अयोध्येत येणाऱ्या पर्यटकांना अविस्मरणीय आदरातिथ्य मिळेल असा दावाही मुख्यमंत्री योगी यांनी केला आहे. 22 जानेवारीला सर्व शासकीय इमारती सजवाव्यात आणि आतषबाजी करण्यात यावी आणि अयोध्येत स्वच्छतेचे 'कुंभ मॉडेल' राबवण्याचे आदेश योगी आदित्यनाथ यांनी दिलेत.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ 14 जानेवारीला अयोध्येत स्वच्छता अभियानाची सुरुवात करणार आहे. त्याधी योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी अयोध्येला भेट देत प्राण-प्रतिष्ठा सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेतला. स्वच्छता आणि सुरक्षेत कोणतीही तडजोड स्विकारली जाणार नाही अशा सूचनाही योगी आदित्यनाथ यांनी केल्या आहेत. विविध क्षेत्रातील VVIP लोकांच्या राहाण्याचा बंदोबस्त आधीच नियोजित केला जावा, अयोध्याधाममध्ये येणाऱ्या भाविक आणि पर्यटकांना नव्य, दिव्य आणि भव्य अयोध्येची ओळख करुन देण्यासाठी टूरिस्ट गाईड तैनात करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेसाठी देशातूनच नाहीत जगभरातून पाहुणे येणार आहेत. या पार्श्वभूमीवर अयोध्या जिल्हा प्रशासनाला जिल्ह्यातील सर्व हॉटेलमध्ये पाहुण्यांना राहण्यांची व्यवस्था करण्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. अयोध्येला लागून असलेल्या लखनऊमध्येही सर्व हॉटेल्स पाहुण्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहेत.
लखनऊ जिल्हा प्रशासनाने 20 ते 23 जानेवारीदरम्यान लखनऊमधल्या हॉटेलच्या रिकाम्या रुम्सची यादी मागवण्यात आली आहे. ज्यांची राहाण्याची व्यवस्था होत नसेल त्यांच्यासाठी या यादीचा वापर होणार आहे. लखनऊमधल्या सर्वात मोठ्या हॉटेलपैकी एक असलेल्या सेंट्रम हॉटेलचे सर्व रुम या काळात बुक झाले आहेत. अयोध्येत येणाऱ्या पाहुण्यांमध्ये राजकीय नेते, उद्योगपती, खेळाडू, बॉलिवूड सेलिब्रेटि आणि साधुसंतांचा समावेश असणार आहे.