मुंबई : असे म्हणतात की गरुडाचे डोळे खूप तीक्ष्ण असतात. तीक्ष्ण दृष्टीसाठी गरुडाला जगभरात ओळखले जाते. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, हा शिकारी पक्षी माणसांपेक्षा आठ पटीने चांगलं आणि लांबचं पाहू शकतो. गरुड 500 फूट अंतरावरुनही त्याचे सर्वात लहान शिकार पाहू शकतो. म्हणूनच जेव्हा एखादा व्यक्ती समोरच्याला बोलतो की, तुझी गरुडाची नजर आहे, तेव्हा त्या व्यक्तीसाठी ती खरोखरच एक चांगली कॉम्प्लीमेंट ठरते.
काही लोकांना लहानातली लहान गोष्ट देखील नजरेला दिसते. तर काही लोकांना समोरील गोष्ट ओळखता किंवा पाहाता येत नाही. काहीवेळेला होतं असं की आपल्याला बऱ्याचदा डोळ्यांना सहज गोष्टी दिसत नाहीत.
लोकांना Find The Object Puzzle हा गेम फार आवडतो. तसेच लोकांना कोड देखील सोडवायला आवडते. असेच एक कोडे सध्या चर्चेत आहे. हे कोडे पाहून बहुतेकांचा गोंधळ उडाला आहे. वास्तविक, सोशल मीडियावर एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये एक बिबट्या दिसत आहे, मात्र तो लोकांना दिसत नाही. हा फोटो पाहिल्यानंतर 99% लोकांना त्यात लपलेला बिबट्या सापडला नाही.
पाहा तुम्हाला तरी त्यामध्ये बिबट्या दिसतोय का?
There is a leopard in this picture. Try to spot it. No pun intended pic.twitter.com/xeT87wV1cy
— Amit Mehra (@amitmehra) December 27, 2021
हा फोटो अमित मेहरा नावाच्या युजरने ट्विटरवर शेअर केला आहे. यासोबतच त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'फोटोमध्ये बिबट्या आहे, त्याला शोधण्याचा प्रयत्न करा.' यानंतर सोशल मीडियावर लोकांनी या चित्रात लपलेल्या बिबट्याचा शोध सुरू केला. यानंतर फार कमी लोकांना त्यामध्ये बिबट्या सापडला. तर त्यात लपलेला बिबट्याला शोधण्यात बहुतांश लोकांना अपयश आले आहे.
या फोटोला आतापर्यंत हजारो लाईक्स मिळाले आहेत. सोबतच अनेक जण हा फोटो शेअर करून इतरांना बिबट्याचा शोध घेण्याचे आव्हान देत आहेत. हा फोटो पाहिल्यानंतर अनेक युजर्सनी बिबट्या नेमका कुठे आहे हे सांगितले आहे. त्याच वेळी, अनेक वापरकर्ते चित्रात बिबट्या नसल्याचे सांगत आहेत.
अनेक युजर्सनी झूम करून बिबट्याचा फोटो दाखवला. जेणेकरून लोकांना बिबट्या कुठे आहे हे कळेल. जर तुमच्याकडे देखील गरुडाची दृष्टी असेल, तर शोधूण काढा बिबट्या आणि तुमच्या मित्राला ही प्रश्न विचारा.