यामुळेच जास्त जगतात जपानी लोक...घ्या जाणून

जगातील अन्य देशांतील लोकांच्या तुलनेत जपानी लोक अधिक स्वस्थ आणि फिट असतात. ते आपल्या आरोग्याबाबत ते फारच जागरुक असतात. याच कारणामुळे जपानी लोकांचे आयुष्य अधिक असते. 

Updated: Mar 11, 2018, 03:17 PM IST
यामुळेच जास्त जगतात जपानी लोक...घ्या जाणून title=

मुंबई : जगातील अन्य देशांतील लोकांच्या तुलनेत जपानी लोक अधिक स्वस्थ आणि फिट असतात. ते आपल्या आरोग्याबाबत ते फारच जागरुक असतात. याच कारणामुळे जपानी लोकांचे आयुष्य अधिक असते. 

जपान असा देश आहे जिथे पुरुष साधारणपणे ८० वयापर्यंत जगतात तर महिला ८६व्या वयापर्यंत जगतात. याचाच अर्थ जपानी लोक जगातील इतरांच्या तुलनेत अधिक जगतात. या मागचे रहस्य तरी काय आहे? घ्या जाणून

भाज्या 

जपानी लोक भाज्या खूप खातात. या लोकांच्या मते भाज्या खाल्ल्याने आरोग्य चांगले राहते. तसेच अधिक वर्षे जगता येते. यांचे जेवण अतिशय संतुलित असते. जपानी लोकांच्या थाळीत अर्ध्याहून अधिक हिरव्या भाज्या असतात. याशिवाय विविध डाळींचे सेवन करतात.

ग्रीन टी

जगभरात केल्या गेलेल्या सर्व्हेमधून असे समोर आलेय की ग्रीन टी वजन घटवण्यात फायदेशीर आहे. ग्रीन टीमुळे त्वचेवर सुरकुत्या येत नाहीत. जपानी लोक दिवसांतून कमीत कमी दोन कप ग्रीन टी घेतात. 

ब्रेकफास्ट 

जपानी लोकांसाठी नाश्त्याचे महत्त्व अधिक आहे. त्यांच्या नाश्त्यामध्ये ग्रीन टी, स्टीम राईस, टोफूसह मिसो सूप, हिरवा कांदा, ऑम्लेट आणि माशाच्या तुकड्याचा समावेश असते.

सी फूड

जपानी लोकांनी सी फूड खायला आवडते. चिकन, मटण अथवा बीफपेक्षा ते सी फूडला पसंती देतात. समुद्रातील मासे त्यांना विशेष आवडतात. यूएनच्या रिपोर्टनुसार जपानमध्ये दरवर्षी 100,000टन सी फूडची विक्री होते.

ऑनसेन-हॉट स्प्रिंग 

जपानचे लोक आपले शरीर सुंदर बनवण्यासाठी तसेच डोके शांत ठेवण्यासाठी विशिष्ट प्रकारचा डाएट घेतात. याला ऑनसेन-हॉट स्प्रिंग असे म्हटले जाते.