तिहार जेलमध्ये अरविंद केजरीवाल जवळ का ठेवतात चॉकलेट? 12 दिवसांत 4.5 किलो वजन झालं कमी

Delhi CM Health Update in Jail: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तुरुंगात आहेत. या दरम्यान त्यांच तब्बल 4.5 किलो वजन कमी झालं. एवढंच नव्हे तर या 12 दिवसांत त्यांना स्वतःजवळ चॉकलेट ठेवण्याची परवानगी देखील घ्यावी लागलं. असा कोणता आजार आहे, जाणून घ्या या आजाराबाबत. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Apr 5, 2024, 05:59 PM IST
तिहार जेलमध्ये अरविंद केजरीवाल जवळ का ठेवतात चॉकलेट? 12 दिवसांत 4.5 किलो वजन झालं कमी title=

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दारू घोटाळा प्रकरणामुळे गेल्या काही दिवसांपासून तिहार जेलमध्ये आहेत. ईडीने 21 मार्च रोजी मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती. दिल्ली न्यायालयाने त्याला १५ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अशा परिस्थितीत केजरीवाल यांना त्यांच्यासोबत टॉफी ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे, त्यामागील कारण जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. याविषयी आम्ही तुम्हाला सांगतो.

या कारणामुळे चॉकलेटची परवानगी 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, न्यायालयाने तुरुंग अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांना काही सामान आपल्याजवळ ठेवण्याची परवानगी देण्याचे आदेश दिले होते. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मधुमेह असल्याने त्यांना इसबगोल, ग्लुकोज आणि टॉफी सोबत ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय त्यांना शुगर सेन्सर आणि ग्लुकोमीटरही देण्यात आले आहे. ज्यामुळे त्यांची रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. केजरीवाल यांना हायपोग्लायसेमिया मधुमेह आहे, ज्यामध्ये रक्तातील साखरेची पातळी लक्षणीयरीत्या कमी होते. अशा परिस्थितीत, टॉफी किंवा काही गोड पदार्थ जवळ ठेवणे आवश्यक असते. 

साखरेची पातळी कमी झाली

केजरीवाल यांना तीव्र मधुमेह आहे, ज्यामध्ये त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी अनेक वेळा खाली गेली आहे. आम आदमी पार्टी (आप) नेते आतिशी यांनीही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर माहिती दिली होती केजरीवाल यांना मधुमेह आहे. 

चॉकलेट का जवळ ठेवावे?

तज्ज्ञांच्या मते, रक्तातील साखर कमी झाल्यास टॉफीचे सेवन फायदेशीर ठरू शकते, त्यामुळे हायपोग्लायसेमिया असलेल्या रुग्णांना ती सोबत ठेवण्याचा सल्ला दिला जातो. फळे आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये सुक्रोज, फ्रक्टोज आणि लैक्टोज यांसारखे कर्बोदके आढळतात, जे त्वरित ऊर्जा प्रदान करतात. टॉफी, मिठाई किंवा चॉकलेट खाऊन हे साध्य करता येते, यामुळे रक्तातील साखर झपाट्याने वाढते आणि अशक्तपणा किंवा थकवा यासारख्या लक्षणांपासून त्वरित आराम मिळतो.

सावधगिरी देखील आवश्यक

टॉफीचे सेवन रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी उपयुक्त मानले जात असले तरी, मधुमेहाच्या रुग्णांना ते खाताना काळजी घ्यावी लागते, कारण यामुळे रक्तातील साखरेची पातळी धोकादायक पातळीपर्यंत वाढू शकते. अशा परिस्थितीत, रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी, आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याचे सेवन केले पाहिजे. याशिवाय, रक्तातील साखरेची पातळी राखण्यासाठी, ग्लायसेमिक इंडेक्ससह पर्यायांना प्राधान्य दिले पाहिजे.

रक्तातील साखरेची पातळी का वाढते?

मधुमेहाच्या रुग्णांना सामान्य ग्लुकोजची पातळी 70 mg/dL आणि 100 mg/dL पर्यंत राखण्यासाठी जीवनशैली आणि आहाराची विशेष काळजी घ्यावी लागते. याशिवाय पुरेशी झोप न मिळाल्याने रक्तातील साखरेची पातळीही वर-खाली होऊ शकते. याशिवाय, शारीरिक ऍक्टिविटी देखील  टिकवून ठेवण्यासाठी मोठी भूमिका बजावतात. अशा परिस्थितीत डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय काहीही खाण्याची चूक तुमच्यासाठी घातक ठरू शकते.

(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)