अँटी एजिंगचा प्रयोग फसला? करोडपती उद्योजकाच्या चेहऱ्याची काय अवस्था झाली पाहा

करोडपती टेक गुरु ब्रायन जॉन्सन (Bryan Johnson) यांनी वृद्धत्वविरोधी प्रयोग (Anti Ageing Experiment) केला असता तो फसला असून त्यांचा चेहरा पूर्णपणे सुजला आहे. चिरतरुण राहण्यासाठी त्यांनी सर्वात आधी मुलाचं रक्त स्वत:ला चढवून घेतलं होतं. यानंतर बेबी फेससाठी चेहऱ्यात फॅट इंजेक्ट केल होतं. त्यांनी या प्रक्रियेचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.   

शिवराज यादव | Updated: Nov 19, 2024, 04:13 PM IST
अँटी एजिंगचा प्रयोग फसला? करोडपती उद्योजकाच्या चेहऱ्याची काय अवस्था झाली पाहा title=

47 वर्षीय करोडपती टेक गुरु ब्रायन जॉन्सन (Bryan Johnson) नेहमीच स्वत:वर वृद्धत्वविरोधी प्रयोग (Anti Ageing Experiment) करत असतात. आपलं वाढतं वय रोखण्यासाठी ते कोणत्याही थराला जाण्यास तयार असतात. चिरतरुण राहण्यासाठी त्यांनी सर्वात आधी मुलाचं रक्त स्वत:ला चढवून घेतलं होतं. यानंतर बेबी फेससाठी चेहऱ्यात फॅट इंजेक्ट केल होतं. दरम्यान या प्रक्रियेनंतरचा फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो पाहिल्यानंतर तुम्हाला धक्का बसेल. 

ब्रायन जॉन्सनने आपलं वय कमी दाखवण्यासाठी आपल्या चेहऱ्यात फॅट इंजेक्ट केलं. या प्रक्रियेला त्यांनी 'प्रोजेक्ट बेबी फेस' नाव दिलं होतं. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, हा प्रयोगाचा परिणाम काय होता यासंदर्भात त्यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर केला असून भलीमोठी पोस्ट लिहिली आहे. या प्रोजेक्टबद्दल बोलताना त्यांनी सांगितलं की, त्यांना चेहऱ्यात फॅट इंजेक्ट करण्याचा सल्ला देण्यात आला होता. याचं कारण त्यांच्या शरिरातून फार फॅट बाहेर पडत होतं. 

ब्रायन जॉन्सन यांची काय तरुण राहण्याची इच्छा आहे, म्हणजेच कितीही वय झालं तरी त्याचा प्रभाव चेहऱ्यावर दिसणार नाही. 2020 मध्ये त्यांची प्रकृती फार खराब झाल्यानंतर त्यांनी हा प्रयत्न सुरु केला होता. त्यावेळी त्यांनी 'प्रोजेक्ट ब्ल्यूप्रिंट' सुरु केलं होतं. याअंतर्गत ते कठोर दैनंदिनी पाळतात. यामध्ये ते एकाच प्रकारच्या गोळ्या, भोजन यांचं सेवन करतात. 

तरुण दिसण्यासाठी करोडपतीने त्याच्या चेहऱ्यावर इंजेक्ट केलं फॅट

ब्रायन म्हणाले की, प्रकल्पाची ब्लू प्रिंट जसजशी विकसित होत गेली तसतशी छाननी वाढत गेली. आम्हाला असे आढळले आहे की लोक ज्या प्रकारे तरुण दिसतात त्यासाठी चेहर्यावरील चरबी खूप महत्वाची आहे. जर माझ्या चेहऱ्यावर चरबी नसेल, तर माझे बायोमार्कर्स किती चांगले आहेत हे महत्त्वाचे नसते. म्हणून आम्ही 'प्रोजेक्ट बेबी फेस' सुरू केला.

डोनरच्या शरीरातून घेतलेली अतिरिक्त चरबी

आम्ही प्रथम थेरपी निवडली. यात माझ्या शरीरातील नैसर्गिक चरबी वाढवण्यासाठी आवश्यक असलेल्या फॅट-व्युत्पन्न एक्स्ट्रासेल्युलर मॅट्रिक्सचे इंजेक्शन समाविष्ट होते.यासाठी कोणाच्या तरी स्वतःच्या शरीरातील चरबी वापरणे शक्य होते, परंतु समस्या अशी होती की माझ्या शरीरावर काढण्यासाठी पुरेसे नव्हते, म्हणून मी डोनर वापरला.

फॅटचे इंजेक्शन दिल्यानंतर चेहरा सूजू लागला

फॅटच्या इंजेक्शननंतर लगेचच माझा चेहरा सुजायला लागला आणि नंतर तो आणखी वाढला. इतकं की मला बघताही येत नव्हतं. ही एक गंभीर एलर्जीची प्रतिक्रिया होती. ब्रायन म्हणाले की, सात दिवसांनंतर माझा चेहरा सामान्य झाला आणि आम्ही आमच्या पुढील प्रयत्नांसाठी पुन्हा नियोजन करण्यास सुरुवात केली.