मुंबई : फुफ्फुसांचा कॅन्सर हा सामान्यपणे आढळणारा एक धोकादायक कॅन्सर आहे. बदलत्या लाईफस्टाईलमुळे, वातावरणातील प्रदुषित हवा, धुम्रपानाची सवय फुफ्फुसांचे आरोग्य बिघडवण्यास कारणीभूत ठरते. तरूणांमध्ये फुफ्फुसाच्या कॅन्सरचं प्रमाण कमी असले तरीही वाढत्या वयासोबत त्याचा धोका झपाट्याने वाढत आहे.
कॅन्सर या आजाराच्या नावावेही अनेकांचा थरकाप उडतो. त्यामुळे कोणालाही कुठल्याही टप्प्यावर गाठू शकणार्या कॅन्सरची शरीराकडून मिळणारी लक्षण वेळीच ओळखल्यास त्यावर मात करता येऊ शकते. 1 ऑगस्ट हा दिवस जागतिक स्तरावर Lung Cancer Day म्हणून पाळला जातो. मग भविष्यात या आजाराचा धोका कमी करण्यासाठी या लक्षणांंकडे दुर्लक्ष नको.
2-3 आठवड्याहून अधिक काळ जर कफ कायम राहत असेल तर तो धोक्याची घंटा आहे. सतत खोकला वाढणं त्यामधून छातीत वेदना जाणवणं याकडे दुर्लक्ष करू नका.
जर खोकताना कफामध्ये रक्त आढळल्यास ते कॅन्सरचं एक लक्षण आहे. कफाचा सामान्य रंग पिवळा, हिरवट असतो. मात्र रक्त मिश्रित कफ तांबूस रंगाचा दिसतो.
श्वास घेताना त्रास होणं, छाती भरून आल्यासारखं वाटणं, सतत दम लागणं हे फुफ्फुसांच्या कॅन्सरचे संकेत देतात.
आवाज जाडसर होणं, श्वास घेतानाही आवाज जाणवणं, चेहर्यावर सूज जाणवणं, हळूहळू सूज हात, मानेजवळही पसरते.
कमवुवत झालेली रोगप्रतिकारक्षमता, शरीरात पुरेशी उर्जा असणं यामुळे आजारी पडण्याचं प्रमाण वाढतं. ब्रोन्कायटीससारखे श्वसनाचे आजार अधिक बळावतात. छातीमध्ये अनियमित प्रमाणात फ्ल्युईड साचल्याने न्युमोनिया बळावतो. कावीळ, अस्थमा यांचा त्रास वाढतो.
जसाजसा कॅन्सर बळावतो तो शरीराच्या इतर भागमध्ये पसरू शकतो. यामुळे सांध्याचं दुखणं, कंबरेचं दुखणं वाढतं.
कॅन्सरचे सेल्स नर्व्हस सिस्टीममध्ये पोहचतात. यामध्ये डोकेदुखी, चक्कर येणं, वागणूकीत बदल जाणवणं, सुन्न होणं अशी लक्षण वाढतात.