मुंबई : वजन वाढवण्यासाठी आणि घटवण्यासाठी अशा दोन्ही गोष्टींसाठी केळं फायदेशीर ठरते.
केळ्याचा आहारात योग्य प्रमाणात वापर केल्यास केळं फायदेशीर आहे. पण मधल्या वेळेस भूकेवर मात करण्यासाठी तुम्ही केळं खात असल्यास हा सल्ला नक्की जाणून घ्या. आहारात केळ्याचा अतिप्रमाणात समावेश झाल्यास त्यामुळे कोणकोणते धोके वाढतात हेदेखील नक्की जाणून घ्या.
केळ्यामध्ये इतर फळांच्या तुलनेत अधिक कॅलरीज असतात. यामुळे तुम्ही अधिक प्रमाणात आहारात केळ्याचा समावेश करत असाल तर त्यामुळे वजन वाढण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे आहाराप्रमाणेच व्यायामावरही लक्ष ठेवा.
हेल्दीफाय मी च्या माहितीनुसार एका मोठ्या आकाराच्या केळ्यामध्ये १२० कॅलेरीज असतात.
मधूमेहींच्या आहारात पथ्यपाण्याचं गणित सांभाळावं लागतं. साखरेचे प्रमाण अधिक असल्याने रक्ताची पातळी नियंत्रणात नसणार्यांमध्ये अचानक चढ उताराचा धोका बळावतो. ग्लायस्मिक इंडेक्स अधिक असल्याने टाईप 2 डाएबिटीस अधिक वाढण्याचा धोका असतो.
आहार संतुलित असणं गरजेचे आहे. तुम्ही केवळ केळ्याच्या सेवनाने भूकेवर मात करत असाल तर यामुळे शरीरात पोषकघटकांची कमतरता निर्माण होऊ शकते. परिणामी शरीरात कमजोरी निर्माण होऊ शकते.
हेल्दी माणूस दिवसाला दोन बाऊल फळ खाऊ शकतात. म्हणाजेच दिवसाला दोन केळी खाणं फायदेशीर आहे. त्यापेक्षा अधिक केळ्याचा आहारात समावेश केल्यास कॅलरीज वाढू शकतात.