मुंबई : त्वचेवर चामखीळ येणं ही समस्या वर पाहता लहान वाटत असली तरीही कलांतराने ती त्रासदायक ठरू शकते. अशावेळेस चामखीळ काढून टाकण्यासाठी काही लोकांना लेझर ट्रिटमेंट्ससारख्या सर्जरीचा पर्याय निवडावा लागतो. वेळेऐच चामखीळीच्या समस्येकडे लक्ष दिल्यास त्याला समूळ नष्ट करणं घरच्या घरी शक्य आहे. मग पहा चामखीळ हटवण्याचे काही घरगुती उपाय -
चामखीळीपासून सुटका मिळवायची असेल तर गुलाबपाणी फायदेशीर ठरते. गुलाबपाण्याला काही वेळ प्रखर सूर्यप्रकाशात ठेवा. थोडं गरम झाल्यानंतर त्वचेवर हे पाणी लावा. यामुळे त्वचा मोकळी होण्यास मदत होते. चेहर्यावर सतत चामखीळ येत असल्यास गुलाबपाण्याचा हमखास वापर करा.
बेकिंग सोड्यामध्ये थोडेसे एरंडेल तेल मिसळा. ही पेस्ट चामखीळीवर लावा. या उपायाने चामखीळ हळूहळू नरम होते. नियमित हा उपाय केल्यास चामखीळ दूर होण्यास मदत होते.
कलोंजीच्या दाण्याची पेस्ट करा. रात्री झोपण्यापूर्वी चामखीळीवर ही पेस्ट लावा. सकाळी कोमट पाण्याने हा भाग स्वच्छ करा.