अन्न नीट पचत नाहीये? तुमचं शरीर देतंय तुम्हाला हे 3 संकेत

अन्नाचं पचन योग्य पद्धतीने होत नसल्यास ही लक्षणं दिसून येतात.

Updated: Oct 26, 2022, 05:28 PM IST
अन्न नीट पचत नाहीये? तुमचं शरीर देतंय तुम्हाला हे 3 संकेत title=

मुंबई : काहीवेळा जेवल्यानंतर पोट जड होण्याची किंवा पोट फुगीची समस्या उद्भवते. मुळात अन्नाचं योग्य पद्धतीने अन्नाचं पचन न झाल्याने या तक्रारी समोर येतात. याला अपचन म्हणतात. अपचन अनेक कारणांमुळे होऊ शकतं. जसं की, खाण्याची अयोग्य पद्धत, जास्त तेलकट मसालेदार जेवणं. तुमच्या शरीरात अन्नाचं पचन योग्य पद्धतीने होत नसल्यास ही लक्षणं दिसून येतात.

पोट जड वाटणं

कधीकधी जेवल्यानंतर पोट जड झाल्यासारखं वाटत राहतं. मुळात हे अपचनाचं लक्षण आहे. जेवणापूर्वी किंवा अर्धवट जेवणानंतर पोट जड झाल्याची समस्या दिसून येत असल्यास हे अपचन असल्याचं चिन्ह आहे. कारण तुम्ही अगोदर खाल्लेलं अन्न नीट पचलं नसल्याने असं होतं. 

पोटाच्या वरच्या भागात जळजळ

जेव्हा तुमची पचन प्रक्रिया कमजोर असते किंवा अन्नाचं योग्यरितीने पचन होत नाही. अशावेळी तुम्हाला पोटाच्या वरच्या भागात जळजळ होण्याची समस्या जाणवते. तुमची छाती आणि नाभीच्या मधील भागात जळजळ जाणवत असल्याचं ते अपचनाचं लक्षणं मानलं जातं.

गॅसचा त्रास आणि ढेकर

शरीराच्या वरच्या पचनमार्गातून अतिरिक्त हवा काढून टाकण्याची प्रक्रिया म्हणजे ढेकर. ढेकर देणं किंवा गॅस होणं हे नैसर्गिक आणि सामान्य मानलं जातं. परंतु ज्यावेळी हा त्रास वारंवार होतो तेव्हा पचन प्रक्रियेतील बिघाडाचं हे एक लक्षणं असू शकतं. पोटात जास्त प्रमाणात गॅस तयार होणं आणि वारंवार गॅस बाहेर पडणं हे देखील खराब पचनाचं लक्षण आहे. जेव्हा तुम्ही खाल्लेलं अन्न पोटात नीट पचत नाही तेव्हा या समस्या उद्भवतात.