'असा' कमी करा घरच्या घरी काकडीचा कडवटपणा

उन्हाळ्याच्या दिवसात काकडी खाणं आरोग्याला फायदेशीर असते.

Updated: May 18, 2018, 03:58 PM IST
'असा' कमी करा घरच्या घरी काकडीचा कडवटपणा  title=

मुंबई : उन्हाळ्याच्या दिवसात काकडी खाणं आरोग्याला फायदेशीर असते. काकडीमध्ये पाण्याचा अंश नैसर्गिकरित्या अधिक प्रमाणात असल्याने त्याचा आहारात विविध प्रकारे समावेश करता येऊ शकतो. प्रामुख्याने सलाडमध्ये काकडी वापरली जाते. पण अनेकदा काकडी ही अनपेक्षितरित्या कडवट निघते आणि सार्‍या उत्साहावर पाणी पडते. 

सलाड बनवण्यापूर्वी तुम्ही काकडीची चव एकदा चाखून पाहिल्यास तुम्हांला कडवट काकाडी सलाडमध्ये मिसळल्यापूर्वीच त्याचा अंदाज  येईल. काही खास टीप्सच्या मदतीने काकडीचा कडवटपणा तुम्हांला काढून टाकण्यास मदत होऊ शकते. 

कडवट काकडीचा कडूपणा कसा कराल कमी? 

डिहायड्रेशनचा त्रास कमी करण्यासाठी काकडी खाणं फायदेशीर आहे. काकडीमध्ये व्हिटामिन्स, मिनरल्स, इलेक्ट्रोलाईटस घटक मुबलक प्रमाणात आढळतात. 

तुम्हांला काकडी कडवट लागल्यास, त्याचे दोन लांब तुकडे करा. काकडीच्या तुकड्यांवर मीठ चोळा. मीठ चोळल्यानंतर तुम्हांला त्यावर फेस आलेला दिसेल. 2-3 वेळेस अशाप्रकारे केल्याने हळूहळू काकडीचा कडूपणा कमी होण्यास मदत होईल. 

काकडीची दोन्ही टोकं कापा. काकडीचे तुकडे करण्यापूर्वी त्यावर फोर्कने टोचे मारा. यामुळे काकडीचा कडवटपणा कमी होण्यास मदत होईल. यानंतर काकडी धुऊन खाऊ शकता. 

काकडीचा कडवटपणा दूर करण्यासाठी काकडीचा वरचा भाग कापा. त्यावर थोडे मीठ चोळा. त्यानंतर कापलेल्या काकडीच्या तुकड्यानेच मीठ चोळा. 
असे काकडीच्या दोन्ही बाजूने करावे. त्यानंतर काकडीला धुऊन त्याचा वापर  करता येऊ शकतो. यामुळे काकडीचा कडवटपणा कमी होण्यास मदत होते.