मुंबई : मूळव्याधीचा त्रास हा अत्यंत वेदनादायी आहे. अनेकजण मूळव्याधीचा त्रास सहन करत राहतात. हळूहळू हा आजार अधिक गंभीर होतो परिणामी शस्त्रक्रियेची मदत घ्यावी लागते. मूळव्याधीच्या समस्येबाबत खुल्यापणाने बोलले जात नाही त्यामुळे त्यावर नियंत्रण वेळीच मिळवणं कठीण होऊन बसतं.
मूळव्याधीचा त्रास आटोक्याट ठेवण्यासाठी तुमचा आहार संतुलित असणं गरजेचे आहे. आहारात फायबरयुक्त घटकांचा मुबलक प्रमाणात समावेश करणं आवश्यक आहे. सोबतच नियमित 7-8 ग्लास पाणी प्यावे. यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रासही आटोक्यात राहण्यास मदत होते. बद्धकोष्ठतेच्या त्रासाकडेही वेळीच लक्ष न दिल्यास त्यामधून मूळव्याधीचा त्रास वाढतो. आहारात 'या' भाजीचा समावेश कराल तर दूर होईल 'मूळव्याधी'ची समस्या !
अनेकदा मूळव्याधीचा त्रास जसाजसा वाढतो तसा मलविसर्जनाच्या वेळेस त्रास होणं, रक्त पडणं असा त्रास उद्बभवतो. गुद्द्वाराजवळील रक्तवाहिन्यांवर आलेला दाब असह्य झाला की त्या फाटतात. परिणामी मलविसर्जनाच्या वेळेस रक्त पडते.
मूळव्याधीचा त्रास असह्य आणि अत्यंत वेदनादायी असल्याने त्याकडे दुर्लक्ष करणं टाळा. गरोदरपणाच्या काळात स्त्रियांमध्ये बद्धकोष्ठतेचा त्रास वाढतो. हा त्रास कालांतराने त्यांच्यासाठी मूळव्याधीचं कारण ठरू शकतात. .गरोदर स्त्रियांमधील 'हा' त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी गुलकंद फायदेशीर
मलविसर्जानाच्या वेळेस येणारा दाब,सूज यापासून आराम मिळवायचा असल्यास पेट्रोलियम जेली किंवा तेलाच्या मदतीने मसाज करणं फायदेशीर ठरू शकतं.
सुरूवातीच्या टप्प्यात आणि नियंत्रणात ठेवू शकाल अशा स्वरूपात मूळव्याधीचा त्रास असल्यास पेट्रोलियम जेलीचा मसाज फायदेशीर ठरतो. यासोबतच मूळव्याधीच्या समस्येवर जादुई ठरतील हे '8' घरगुती उपाय