स्वयंपाकघरातील हे '6' पदार्थ घोरण्याच्या समस्येवर ठरतील रामबाण उपाय

विना शस्त्रक्रिया मिळवा घोरण्याच्या समस्येतून सुटका 

Updated: Apr 17, 2018, 12:48 PM IST
स्वयंपाकघरातील हे '6' पदार्थ घोरण्याच्या समस्येवर ठरतील रामबाण उपाय

मुंबई : काहीजणांमध्ये केवळ खूप शारीरिक कष्टाचं काम  झालं तरच घोरण्याचा त्रास जाणवतो. तर काहींना नाक बंद असेल तर घोरण्याचा त्रास जाणवतो. घोरण्याचा नकळत त्रास त्या व्यक्तीला होतो सोबतच त्याच्या शेजारी झोपणारी व्यक्तीदेखील त्रस्त होते. घोरण्याच्या आवाजामुळे इतरांचीही झोपमोड होते. घोरण्याची समस्या लहान वाटत असली तरीही त्याकडे दुर्लक्ष करू नका. घोरण्याच्या समस्येवर काही घरगुती उपायांनीही नियंत्रण मिळवता येऊ शकते. 

पुदीना तेल -  

झोपण्यापूर्वी पाण्यामध्ये पुदीन्याच्या तेलाचे काही थेंब टाका. या पाण्याने गुळण्या करा. या उपायाने नाकातील छिद्रातील सूज कमी होण्यास मदत होईल. यामुळे श्वास घेण्याची प्रक्रिया अधिक सुकर होईल. रात्री झोपण्यापूर्वी नाकपुडीजवळ पुदीन्याचं तेल लावा. 

साजूक तूप -

साजूक तुपाच्या मदतीने घोरण्याच्या समस्येवर नियंत्रण मिळवता येते. रात्री झोपण्यापूर्वी तूप थोडे पातळ करा. तूपाचे थेंब नाकपुडीत घाला. हा उपाय नियमित केल्याने त्रास कमी घोरण्याचा त्रास कमी होण्यास मदत होईल.  

टी ट्री ऑईल- 

नाक चोंदल्यानेही घोरण्याचा त्रास वाढू शकतो. अशावेळेस पाण्यात टी ट्री ऑईलचे काही थेंब टाका. या पाण्याची वाफ घ्या. यामुळे नाक मोकळे होण्यास मदत होईल.  

वेलची पावडर - 

रोज झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात वेलचीची पूड मिसळा. हे मिश्रण पिऊन झोपल्याने घोरण्याचा त्रास आटोक्यात राहण्यास मदत होते. रोज खा फक्त 2 वेलची ; होतील भरपूर फायदे

हळद - 

धडपडल्यानंतर वाहणारे रक्त थांबवण्यापासून अगदी रोगप्रतिकारकक्षमता सुधारण्यासाठी हळद फायदेशीर ठरते. रात्री झोपण्यापूर्वी किमान अर्धा तास आधी हळदीचं दूध प्या. यामुळे झोपही शांत मिळते सोबतच घोरण्याचा त्रास आटोक्यात राहतो. हळदीच्या दुधाचे होतात 10 फायदे  

मध -

रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यामध्ये मध मिसळून प्या. या मिश्रणाच्या नियमित सेवनाने श्वास घेण्याचा त्रास आटोक्यात राहण्यास मदत होते. मध किती काळ टिकून राहू शकतं ?