रश्शी उडी मारण्याचे 5 आरोग्यदायी फायदे !

आजकाल सुट्ट्यांच्या काळात मुलं मैदानी खेळांऐवजी लॅपटॉप किंवा स्मार्टफोनवरच चिकटून बसतात. त्यामुळे खो-खो, लगोरी यसारखे अनेक खेळ आजच्या मुलांना ठाऊक नाही. अशातच विस्मरणात गेलेला एक खेळ म्हणजे रस्शी उडी. रस्शी उडी हा केवळ खेळ नसून एक उत्तम फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटी आहे. त्यामुळे लहानमुलांपासून अगदी वयोवृद्धांपर्यंत कोणीही नियमित रस्शी उडी मारणं फायदेशीर ठरू शकते. तुम्हांला ठाऊक आहेत का रस्शी उडी मारण्याचे आरोग्यदायी फायदे?   

Updated: May 7, 2018, 04:13 PM IST
रश्शी उडी मारण्याचे 5 आरोग्यदायी फायदे ! title=

 मुंबई : आजकाल सुट्ट्यांच्या काळात मुलं मैदानी खेळांऐवजी लॅपटॉप किंवा स्मार्टफोनवरच चिकटून बसतात. त्यामुळे खो-खो, लगोरी यसारखे अनेक खेळ आजच्या मुलांना ठाऊक नाही. अशातच विस्मरणात गेलेला एक खेळ म्हणजे रस्शी उडी. रस्शी उडी हा केवळ खेळ नसून एक उत्तम फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटी आहे. त्यामुळे लहानमुलांपासून अगदी वयोवृद्धांपर्यंत कोणीही नियमित रस्शी उडी मारणं फायदेशीर ठरू शकते. तुम्हांला ठाऊक आहेत का रस्शी उडी मारण्याचे आरोग्यदायी फायदे?   

 रस्शी उडी मारण्याचे आरोग्यदायी फायदे -  

1. मिनिटाभराच्या रस्शीउडीच्या व्यायामामुळे सुमारे 10-16 कॅलरीज बर्न होण्यास मदत होते. यामुळे वेट लॉसच्या मिशनवर असणार्‍यांसाठी रस्शी उडी हा उत्तम वर्कआऊटचा प्रकार ठरू शकतो. या व्यायामामुळे वजन आटोक्यात राहते. फ्लॅट बेली मिळवण्यासाठी प्रयत्न करत असाल तर तुम्हांला नक्कीच फायदा होऊ शकतो.  

2. रस्शी उडी मारल्याने हाडांना मजबुती मिळते. सोबतच हाडांची बोन डेन्सिटी सुधारण्यास मदत होते. यामुळे हाडं मजबुत होतात.म्हणूनच लहानपणापासून मुलांना रस्शी उडी मारण्याची सवय लावा.  

3. वजन घटवण्यासाठी तुम्हांला जीम, व्यायाम या कष्टाच्या आणि महागड्या पर्यायाशिवाय मदत करत करणारा एक उपाय म्हणजे नियमित रस्शी उडी मारणं. या व्यायामामुळे वजन आटोक्यात ठेवण्यास मदत होते.  

4. रस्शी उडी या व्यायामामुळे शरीरात रक्तभिसरणाची प्रक्रिया सुधारण्यास मदत होते. त्वचेला पोषण मिळते परिणामी घामाच्या रूपाने विषारी घटक शरीराबाहेर पडण्यास मदत होते. यामुळे शरीर स्वस्थ  राहण्यास मदत होते. 

5. रस्शी उडी या व्यायामुळे फुफ्फुसाच्या कार्यालाही चालना मिळते. या खेळामुळे फुफ्फुसांची क्षमता सुधारते. परिणामी हृद्याची अनियंत्रित धडधड सुरळीत राहण्यास मदत होते.