मुंबई : मूग डाळ पचायला हलकी आणि आरोग्यदायी असल्याने आजारपणात मूगडाळीचे सूप, मूग डाळीचे वरण आणि भात फायदेशीर ठरते. मूग डाळीमुळे चेहरा उजळण्यास मदत होते. चेहर्यावरील डाग हटवण्यापासून ते अगदी डोळ्यांखालील काळी वर्तुळं कमी करण्यासाठी मूग डाळ फायदेशीर आहे.
मूगडाळीमध्ये व्हिटॅमिन आणि फॉस्फरस घटक मुबलक प्रमाणात असतात. यामुळे चेहर्यावरील सुरकुत्या कमी होत्या. तसेच नैसर्गिकरित्या चेहर्यावरील डाग कमी करण्यासाठी मूग फायदेशीर आहे.
मूगडाळीमध्ये कॉपर मुबलक प्रमाणात आढळतात. यामुळे केस मजबूत होण्यास मदत होते. मूगडाळीमुळे मेंदूमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होण्यास मदत होते. केसांना समूळ मजबुतपणा येण्यास मदत होते.
मूग पचायला हलका असल्याने अनेक समस्या कमी होण्यास मदत होते. त्यामधील फायबर घटक पचनक्रिया सुरळीत करण्यास मदत होते. पोटात गॅस जमा होण्याचं प्रमाण नियंत्रणात राहते.
मूग भूकेवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. यामुळे वजन घटवण्याचा प्रयत्न करणार्यांनी मधल्या वेळेत लागणार्या भूकेवर नियंत्रण ठेवण्यासाठी मूग खाणं फायदेशीर आहे. तसेच मूग खाल्ल्याने रक्तदाबाचा त्रासही आटोक्यात राहतो. यामुळे रक्तातील मॅग्नेशियमचा प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते.