रोज 1 लिंबूच्या सेवनाने हे आजार राहतील दूर, मिळतील आश्चर्यकारक फायदे

आपण सगळ्यांनीच हे ऐकले आहे की, लिंबू हा आपल्या शरीरासाठी औषधी आहे.

Updated: Dec 25, 2021, 03:17 PM IST
रोज 1 लिंबूच्या सेवनाने हे आजार राहतील दूर, मिळतील आश्चर्यकारक फायदे

मुंबई : आपण सगळ्यांनीच हे ऐकले आहे की, लिंबू हा आपल्या शरीरासाठी औषधी आहे. त्याचे फायदे आणि उपयोग देखील अनेक आहेत. रोज फक्त एक लिंबू खाल्ल्याने तुम्हाला अनेक प्रकारे फायदा होतो. लिंबूमध्ये असलेले व्हिटॅमिन सी, विरघळणारे फायबर आणि वनस्पती संयुगे तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. याच्या सेवन केल्याने वजन कमी करण्यापासून ते हृदयरोग, अॅनेमिया, किडनी स्टोन आणि पचनाच्या समस्या दूर होतात.

लिंबाच्या सेवनाने फॅटी लिव्हरचीही समस्या दूर होते. त्याच्या नैसर्गिक शुद्धीकरण क्षमतेचा यकृताला फायदा होतो. सकाळी एक ग्लास कोमट पाण्यात लिंबाचा रस प्या. असे केल्याने शरीरातून विषारी द्रव्ये बाहेर पडतात आणि पचनसंस्थाही चांगली राहते.

लिंबाच्या सेवनाने किडनी स्टोनच्या समस्येपासूनही लोकांना फायदा मिळतो. यामध्ये सायट्रेटचे प्रमाण जास्त असते. सायट्रेट कॅल्शियम क्रिस्टल्स तयार होऊ देत नाही.

लिंबाच्या सेवनाने शरीरात चांगले बॅक्टेरिया वाढतात आणि रोगप्रतिकार शक्ती मजबूत राहते. लिंबूमध्ये पेक्टिन नावाचे फायबर असते, जे प्रीबायोटिक असते. हे निरोगी जीवाणूंच्या वाढीस प्रोत्साहन देते. लिंबूमध्ये व्हिटॅमिन-सी भरपूर प्रमाणात असते, त्यामुळे त्याचे सेवन त्वचेसाठीही खूप फायदेशीर देखील आहे.

जर तुमचा घसा खराब असेल तर गरम पाण्यात लिंबू पिळून घ्या. कोमट पाण्यात लिंबू आणि मध मिसळून प्यायल्यानेही फायदा होईल. परंतु हे लक्षात घ्या पाणी जास्त गरम असू नये तसेच पाण्यात लिंबाचा रस किंवा लिंबाला उकळू नये, असे केल्यास त्याचा प्रभाव कमी होतो.