मोज्यांंशिवाय बूट घालण्याची सवय आरोग्यासाठी ठरू शकते घातक

आजकाल फॅशनच्या नावाखाली काही चूकीच्या गोष्टीं आंधळेपणाने फॉलो करण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. 

Updated: May 14, 2018, 09:05 PM IST
मोज्यांंशिवाय बूट घालण्याची सवय आरोग्यासाठी ठरू शकते घातक title=

 मुंबई : आजकाल फॅशनच्या नावाखाली काही चूकीच्या गोष्टीं आंधळेपणाने फॉलो करण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. यामुळे कळत नकळत आरोग्यावर त्याचा दुष्परिणाम दिसून येतो. अशाच फॅशन ट्रेंडपैकी एक म्हणजे सॉक्स/ मोजे न घालता बूट घालणं. 

 
 मोज्यांशिवाय शूज घालण्याचे काय होतात परिणाम?  

 
 मोज्यांशिवाय बूट घातल्याने पायांना दुर्गंधी येते सोबतच आरोग्यावरही त्याचा परिणाम होतो. 
 
 कॉलेज ऑफ पोडियाट्रीच्या अहवालानुसार मोज्यांशिवाय बूट घालण्याच्या फॅशनमुळे पुरूषांमध्ये फंगल इंफेक्शनचा धोका वाढला आहे. 
 
 अनेक नवशिखे मॉडलदेखील मोज्यांशिवाय कॅटवॉक करताना दिसतात. 
 
 पायांच्या समस्यांवर उपचार करणारे डॉक्टर एमा स्टीफन्सनने बीबीसीला दिलेल्या माहितीनुसार, 18-25 वयातील जे पुरूष मोज्यांशिवाय शूज घालतात त्यांच्यामध्ये अनेक आजारांचा धोका बळावतो. 
 
 दिवसाला सुमारे 300 मिलीलीटर घाम येतो. अति घाम आणि उष्णतेमुळे कोणाच्याही पायाला फंगल इंफेक्शन होऊ शकते.  

 कशी घ्याल काळजी?   

 मोज्यांशिवाय कमीत कमी वेळ बूट  घालून फिरा. 
 
 पायाला घाम येण्याचा त्रास असल्यास बूट घालण्यापूर्वी तळव्यांवर अ‍ॅन्टीपर्सिपरेंट स्प्रे करा. 
 
 पायांमध्ये वेदना जाणवत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.