Teenege Love : भारतात पालकांना आपल्या मुलांचे प्रेमसंबंध आहेत हे पचवायला बराच वेळ लागतो विशेषत: त्यातही मुलं कमी वयात शिक्षण सोडून जर प्रेमप्रकरणं करत असतील तर पालकांसाठी खूप मोठी गोष्ट असते. मुलांचे प्रेमसंबंध माहित झाल्यास अनेक पालक निराश होतात काही पालक तर मुलांच्या स्वातंत्र्यावर बंदी आणतात. अशाने मुलं पालकांशी काहीही शेअर करायला घाबरतात. त्यांच्याविषयी मनात राग धरता. परिणामी पालक आणि मुलांमधील संबंध खराब होतात. (Children in love at a young age Parents avoid these mistakes nz)
शक्यातो पालकांनी सगळ्यात आधी किशोरवयीन मुलं त्या वयात प्रेमासारख्या संकप्लनेकडे लवकर आकर्षित होतात. हे वय असंच आहे जिथं चुका सर्वांकडूनच होतात. पण, अशा वेळी मुलांच्या चुकीवर चर्चा न करता पालकांनी त्यांचा भावनांचा सन्मान करावा. याचा अर्थ असा नाही की मुलांना प्रेम संबंध ठेवायला परवानगी द्यावी. अशा वेळेस मुलांना तुम्ही विश्वासात घेऊन समजावू शकता.
1. या सर्व प्रकरणांमध्ये, कधीकधी मुलांना पालकांच्या आधाराची खूप गरज असते परंतु पालक मुलांवर राग व्यक्त करत असतात. अशाने मुलांचे मनोधैर्य कमी होते.
2. मुलांचे प्रेमसंबंध माहित झाल्यास पालकांनी त्यांना समजावून सांगावं. त्यांचा मुद्दा शांतपणे ऐकावा.
3. जेव्हा पालकांना मुलांच्या प्रेमसंबंधांविषयी कळते तेव्हा त्यासाठी स्पष्ट नकार न देता मुलं स्वप्नांना प्राधान्य कसं देतील याचा विचार करावा.
4. मुलांसोबत कोणत्याही प्रकारची जबरदस्ती न करता त्यांना समजून घ्यावं. त्यांना विचार करायला वेळ द्यावं. मुलांच्या आयुष्यात प्रमाणाहून जास्त ढवळाढवळ करु नये.
(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)