रोज एकच केळं ठेवतील 'या' आजारांपासून दूर

एक केळं तुम्हाला अनेक आजारांपासून वाचवतं. जाणून घेऊया केळ्याच्या सेवनाने तुम्हाला काय-काय फायदे होतात.

Updated: Feb 2, 2022, 01:33 PM IST
रोज एकच केळं ठेवतील 'या' आजारांपासून दूर  title=

मुंबई : अनेकजण जेवणानंतर एक केळं खातात. पण तुम्हाला माहितीये का? तुम्ही खात असलेलं एक केळं तुम्हाला अनेक आजारांपासून वाचवतं. जाणून घेऊया केळ्याच्या सेवनाने तुम्हाला काय-काय फायदे होतात.

आहार तज्ज्ञ डॉ रंजना सिंह यांच्या सांगण्यानुसार, दररोज 1 केळ खाल्ल्याने अनेक आजारांपासून बचाव होण्यास मदत होतो. केळ्यामध्ये पोटॅशियम आढळतं, ज्यामुळे क्रॅम्प येण्याची समस्या उद्भवत नाही. केळ्यामध्ये कार्बोहायड्रेट असतं जे शरीराला ऊर्जा देण्यास मदत करतं. सकाळच्या व्यायामापूर्वी दोन केळी खाल्ल्यास व्यायाम करताना फारसा थकवा जाणवणार नाही.

केळ्यामध्ये मिळणारी पोषक घटक

केळ्यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी आणि मॅग्नेशियम तसंच व्हिटॅमिन-सी, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन-बी-6, थायामिन, रिबोफ्लेविन हे घटक असतात. केळीमध्ये 65.3 टक्के पाणी, 1.3 टक्के प्रोटीन, 24.7 टक्के कार्बोहायड्रेट असताच. हे सर्व घटक शरीरासाठी आवश्यक असतात.

केळी खाण्याचे फायदे

  • केळ्यांच्या सेवनाने शरीरातील रक्ताचं प्रमाण वाढून शरीराची ताकद वाढते. रोज केळी आणि दुधाचं सेवन केल्याने शरीर तंदुरुस्त राहण्यास मदत होते.
  • केळ्यामध्ये असलेले ट्रिप्टोफॅन अमिनो अॅसिड तणाव कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.
  • वर्कआउटच्या ३० मिनिटं आधी केळी खा. हे तुम्हाला वर्कआउटसाठी ऊर्जा तर देईल सोबतच रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठीही हे उपयुक्त ठरेल.
  • मासिक पाळी दरम्यान होणारी चिडचिड आणि वेदना कमी करण्यासाठी केळ्याचं सेवन मदतशीर ठरू शकतं.