Bad Breath Problem: तोंडाच्या दुर्गंधीने हैराण झालात? जाणून घ्या यामागील खरं कारण

तुम्ही दररोज व्यवस्थित दात घासत असाल आणि तरीही दुर्गंधी येत असेल तर तर यांचं कारण जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे

Updated: Aug 26, 2022, 06:49 PM IST
Bad Breath Problem: तोंडाच्या दुर्गंधीने हैराण झालात? जाणून घ्या यामागील खरं कारण title=

Bad breath problem and its reasons: जर तुम्ही दररोज सकाळ संध्याकाळी दात घासत नसाल तर तोंडातून दुर्गंधी येणं सहाजिक आहे. मात्र, तुम्ही दररोज व्यवस्थित दात घासत असाल आणि तरीही दुर्गंधी येत असेल तर तर यांचं कारण जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला याचं कारण माहित असेल, तरच तुम्ही यावर उपाय करू शकतात. जाणून घेऊयात कोणत्या कारणांमुळे तुमच्या तोंडातून दुर्गंधी येऊ शकते. 

कॉफी

भारतात कॉफी शौकिनांची कमी नाही. कॉफीमध्ये मोठ्या प्रमाणात कॅफेन असतं. कॅफेनमुळे आपल्या शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं. कॉफीचं जास्त प्रमाणात सेवन केल्यास तोंडातील लाळ देखील कमी होते. यामुळे तुमच्या तोंडातील किटाणूंची संख्या वाढते. या किटाणूंमुळे तुमच्या तोंडातून दुर्गंधी येते. 

झोपेच्या किंवा अँटी डिप्रेशन गोळ्या 

ज्यांना रात्री झोप येत नाही किंवा जी माणसं अँटीडिप्रेशनच्या गोळ्या घेतात अशांच्या तोंडातून दुर्गंधी येऊ शकते. या गोळ्यांनी तुमच्या तोंडातून दुर्गंधी येऊ शकते. यासाठी लिक्विड डाएट घेण्याचा सल्ला दिला जातो. ज्यांच्या तोंडातून औषधांमुळे दुर्गंधी येत असेल तर नारळपाणी किंवा लिंबूपाण्यानी ही दुर्गंधी कमी होऊ शकते. मन शांत ठेवल्यास तुम्ही तणावापासून दूर राहू शकतात. याने तुम्हाला शांत झोप  येण्यास मदत होईल. 

पाणी कमी पिणे 

आपल्या शरीरात मोठ्या प्रमाणात पाणी असतं. अशात योग्य प्रमाणात पाणी न पिण्याने तुम्हाला डिहायड्रेशन होऊ शकतं. कमी पाणी पिण्याने तुमच्या तोंडात कमी लाळ बनते. अशात तोंडातील किटाणूंची संख्या वाढू शकते. अनेकदा आपल्या दातांमध्ये अन्नपदार्थ अडकलेले असतात. पाणी पिण्याने हे कण पोटात जातात. मात्र तुम्ही पाणीच पित नसाल तर दातातील अन्नपदार्थ तसेच साचून राहतात आणि सडतातही. यामुळे तुमच्या तोंडातून दुर्गंधी येऊ शकते. यासाठी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पर्याप्त पाणी पिणे आणि सोबतच जेवणानंतर कोमट पाण्याने गुळण्या कराव्यात. याने तोंडाची दुर्गंधी कमी होण्यास मदत होते.  

(विशेष नोंद - वरील माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. याचा दैनंदिन जीवनात वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या) 

bad breath problem how to keep dental hygiene intact healthcare tips