'या' कारणामुळे तरुण मुलींच्या मानसिक आरोग्याला धोका, आजच बदला सवय नाहीतर Depression ची भीती

नुकत्याच एका अभ्यासात असे समोर आले आहे की, किशोरवयीन मुलींमध्ये मानसिक आरोग्याच्या समस्यांचा प्रचलन वाढत आहे, आणि यासाठी सोशल मीडियाचा वापर एक प्रमुख कारण आहे. विशेष म्हणजे किशोरवयीन मुलींमध्ये वाढत्या नैराश्याचे कारण म्हणून सोशल मीडियाच्या अत्यधिक वापराचा उल्लेख करण्यात आले आहे.   

Intern | Updated: Dec 30, 2024, 05:42 PM IST
'या' कारणामुळे तरुण मुलींच्या मानसिक आरोग्याला धोका, आजच बदला सवय नाहीतर Depression ची भीती title=

Depression Causes and Prevention: मेटाचे सीईओ, मार्क झुकरबर्ग यांनी काँग्रेसच्या सुनावणीत सांगितले होते की, सोशल मीडियाचा वापर आणि मुलांच्या मानसिक आरोग्याच्या समस्यांमध्ये थेट संबंध नाही. त्यांच्या या विधानामुळे अनेक सामाजिक शास्त्रज्ञ आश्चर्यचकित झाले परंतु नुकत्याचं एका अभ्यास आणि संशोधनाच्या आधारावर असे दिसून आले आहे की, सोशल मीडियाच्या अति वापरामुळे किशोरवयीन मुलींच्या मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

सोशल मीडिया आणि मानसिक आरोग्य:
सोशल मीडियाचा वाढता वापर विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम करत आहे. एका अभ्यासानुसार सोशल मीडियावर अधिक वेळ घालवल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मानसिक तणाव, नैराश्य आणि शैक्षणिक कामगिरीत घट होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या अभ्यासात स्पष्टपणे सांगितले आहे की, जेव्हा विद्यार्थ्यांना सोशल मीडियावर जास्त वेळ घालवण्याची सवय लागते, तेव्हा त्यांना मानसिक दबाव, चिंता आणि सायबर बुलिंग यांचा सामना करावा लागतो. याशिवाय विद्यार्थ्यांच्या झोपेवरही या नकारात्मक परिणामांचा मोठा प्रभाव पडतो.

लहान मुलींवर अधिक प्रभाव:
लॅन्सेट चाइल्ड अँड अ‍ॅडोलसेंट हेल्थ या तज्ञांद्वारे प्रकाशित केलेल्या एका नवीन अभ्यासात हे स्पष्ट झाले आहे की, किशोरवयीन मुलींच्या मानसिक आरोग्यावर सोशल मीडियाचा प्रभाव मुलांपेक्षा अधिक आहे. यामध्ये सांगितले आहे की, मुली सोशल मीडियाचा अधिक वापर करतात आणि त्यांना सायबर बुलिंग, अपुरी झोप, आणि सामाजिक तुलना यासारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. ज्यामुळे त्यांच्या नैराश्याचे प्रमाण वाढते. तर मुलांमध्ये या प्रकारचे प्रभाव तुलनेने कमी आढळले आहेत.

नैराश्य आणि चिंता टाळण्याचे उपाय:
सोशल मीडियाच्या वापरामुळे होणारी मानसिक तणाव आणि नैराश्य टाळण्यासाठी काही उपाय आवश्यक आहेत. तज्ज्ञांचे मत आहे की, सोशल मीडियाचा अतिवापर टाळावा. जर तुम्ही सोशल मीडियावर इतरांना तुमच्यापेक्षा जास्त आनंदी यशस्वी किंवा परिपूर्ण दिसताना पाहता, तर हे तुमच्या मानसिक आरोग्यावर दडपण आणू शकते. यासाठी, मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी योग्य प्रमाणात सोशल मीडियाचा वापर करणे आवश्यक आहे.

हे ही वाचा: https://zeenews.india.com/marathi/health/women-should-not-ignore-these-s...

तसेच, निरोगी आणि संतुलित जीवनशैली महत्त्वाची आहे. चांगला आहार, नियमित व्यायाम, योग्य झोप आणि सकारात्मक सामाजिक संवाद यामुळे मानसिक आरोग्य सुधारता येते. याशिवाय, कुटुंब आणि मित्रांशी संवाद साधणे आणि तणावाच्या स्थितीत तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणे देखील महत्वाचे ठरते. मानसिक आरोग्याच्या समस्यांसाठी लवकर उपचार आवश्यक आहे आणि किशोरवयीन मुलींना याबाबत अधिक जागरूक करण्यात यायला हवे.

सोशल मीडियाचा वापर किशोरवयीन मुलींच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकतो. यामुळे त्यांच्या नैराश्याचा दर वाढत आहे. म्हणूनच, योग्य मार्गदर्शन, जबाबदार वापर आणि मानसिक आरोग्याच्या किमान ज्ञानामुळे किशोरवयीन मुलींच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.

(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही .कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)