एव्हरग्रीन नागार्जुनची पहिली पत्नी कोण? संपत्तीपासून कुटुंबापर्यंत, राजेशाही आयुष्य जगतोय साऊथ सुपरस्टार

Nagarjuna Akkineni's First Wife to Family and Net Worth : एव्हरग्रीन असलेल्या नागार्जुनच्या पहिल्या पत्नीविषयी तुम्हाला माहितीये का? 

दिक्षा पाटील | Updated: Aug 29, 2024, 11:43 AM IST
एव्हरग्रीन नागार्जुनची पहिली पत्नी कोण? संपत्तीपासून कुटुंबापर्यंत, राजेशाही आयुष्य जगतोय साऊथ सुपरस्टार title=
(Photo Credit : Social Media)

Nagarjuna Akkineni's First Wife to Family and Net Worth : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत राज्य करणारा अभिनेता नागार्जुनचा आज 29 ऑगस्ट रोजी 65 वा वाढदिवस आहे. नागार्जुननं चित्रपटसृष्टीत स्वत: ची एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. नागार्जुननं चाइल्ड आर्टिस्ट म्हणून करिअरची सुरुवात केली. त्यानंतर सगळीकडे त्याचीच चर्चा रंगली होती. नागार्जुन हा तेलगू इंडस्ट्रीच्या सगळ्यात श्रीमंत सुपरस्टार अभिनेता आहे. नागार्जुननं फक्त चित्रपटांसोबतच त्याच्या खासगी आयुष्यामुळे देखील सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. 

नागार्जुनची लव्ह लाईफ ही नेहमीच चर्चेचा विषय ठरली आहे. नागार्जुननं दोन वेळा लग्न केलं आणि त्यासोबतच नागार्जुनच्या आयुष्यात एक बॉलिवूड अभिनेत्री देखील होती. नागार्जुननं ईस्टर्न मिशिगन यूनिव्हर्सिटीमधून मॅकेनिकल इंजीनियरिंगमध्ये बीएसची डिग्री घेतली होती. पण त्यानंतर तो चित्रपटसृष्टीकडे वळला. त्यानं खरंतर लहानपणातच अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानं 1986 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'विक्रम'  मधून एक लीड कलाकार म्हणून करिअरची सुरुवात केली. त्यानंतर त्यानं कधीच मागे वळून पाहिलं नाही. नागार्जुननं 'किलर', 'डॉन', 'गीतांजली' आणि 'Siva' सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं होतं. 

नागार्जुनची पहिली पत्नी पहिली पत्नी

नागार्जुननं एक लीड अभिनेता म्हणून पदार्पण करण्याआधी लक्ष्मी दग्गुबातीशी लग्न केलं होतं. लक्ष्मी या फिल्ममेकर डी रामानायडू यांची लेक आणि अभिनेता वेंकटेश आणि निर्माता सुरेश बाबू यांची बहीण आहे. नागार्जुन आणि लक्ष्मी यांना 1986 मध्ये एक मुलगा झाला. त्याचं नाव नागा चैतन्य आहे. आज नागा चैतन्य देखील त्याच्या वडिलांप्रमाणे चित्रपटसृष्टीत सक्रिय असून चांगली कामगिरी करताना दिसत आहे. मात्र, नागार्जुन आणि लक्ष्मी हे 1990 मध्ये विभक्त झाले. 

दुसरं लग्न 

दरम्यान, लक्ष्मी यांना घटस्फोट दिल्यानंतर नागार्जुननं 1992 मध्ये अभिनेत्री अमालाशी लग्न केलं. त्यांना एक मुलगा असून अखिल असं त्याचं नाव आहे. वडिल आणि भाऊप्रमाणे अखिल देखील अभिनय क्षेत्रात सक्रिय आहे. मात्र, त्या दोघांच्या लोकप्रियतेविषयी बोलायचं झालं तर वडिलांच्या तुलनेत ती फार कमी आहे. 

बॉलिवूड अभिनेत्रीसोबत रिलेशनशिप

दोन लग्न केल्यानंतरही नागार्जुन हा बराच काळ एका बॉलिवूड अभिनेत्रीसोबत रिलेशनशिपमध्ये होता. त्यानंतर ते दोघे विभक्त झाले. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही अभिनेत्री कोण? तर ती अभिनेत्री दुसरी कोणी नसून तब्बू आहे. तब्बू आजही वयाच्या 52 व्या वर्षी अविवाहीत आहे. तब्बूनं नागार्जुनसोबत तीन चित्रपटांमध्ये काम केलं आहे. असं म्हटलं जातं की ते दोघं जवळपास 10 वर्ष रिलेशनशिपमध्ये होते आणि त्यानंतर विभक्त झाले. 

नेटवर्थ

नागार्जुनच्या नेटवर्थविषयी बोलायचे झाले तर फायनॅनशियल एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, त्याची एकूण संपत्ती ही 3100 कोटी आहे. फक्त अभिनय नाही तर त्यासोबत चित्रपट निर्मिती आणि स्टुडियोमधून देखील तो पैसा कमावतो. त्याशिवाय नागार्जुन हा बिग बॉस तेलुगूचे सुत्रसंचालन देखील करतो. त्याशिवाय त्याच्यान3 रियल्टी एंटरप्राइजेज, एक रियल इस्टेट आणि कंस्ट्रक्शन फर्म देखील आहे.