राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांच्या लग्नातील कधीही न पाहिलेला फोटो व्हायरल; 16 वर्षांच्या अभिनेत्रीने जिंकली मनं

नुकताचं डिंपल कपाडिया आणि राजेश खन्ना यांच्या लग्नाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये दोघ वधु-वराच्या रुपात आहे. डिंपल कपाडिया नववधूच्या पोषाखात खूप सुंदर दिसत आहे. तर पाहुयात यांचा हा व्हायरल फोटो.   

Intern | Updated: Dec 19, 2024, 03:47 PM IST
राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांच्या लग्नातील कधीही न पाहिलेला फोटो व्हायरल; 16 वर्षांच्या अभिनेत्रीने जिंकली मनं    title=

जेष्ठ अभिनेते राजेश खन्ना आणि डिंपल कपाडियाच्या लग्नाचा 51 वर्षांपूर्वीचा न पाहिलेला फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये डिंपल कपाडिया नववधूच्या रुपात दिसत आहे. त्यांचा हा देखणा लूक चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. राजेश खन्ना यांना हिंदी सिनेमातील पहिला सुपरस्टार म्हणून ओळखले जाते. त्यांच्या करिअरच्या शिखरावर असताना त्यांनी 1973 मध्ये डिंपल कपाडियाशी लग्न केले होते. या लग्नामुळे संपूर्ण देशभर खळबळ उडाली होती, कारण डिंपल केवळ 16 वर्षांच्यां होत्या, तर राजेश खन्ना 31 वर्षांचे होते. 

या फोटोत दोघेही फुलांच्या माळांनी सजलेले आहेत. राजेश खन्ना काळ्या रंगाच्या सूटमध्ये तर डिंपल पारंपरिक वधूच्या वेशात दिसत आहे. हा फोटो ब्लॅक अँड व्हाईट असल्याने त्यांच्या ड्रेसचा रंग स्पष्ट दिसत नसला तरी तो लालसर असावा असे वाटत आहे. ऋषी कपूरही या फोटोमध्ये दिसत आहेत. डिंपल यांनी चित्रपटसृष्टीतील करिअरची सुरुवात ऋषी कपूरसोबत 'बॉबी' चित्रपटातून केली होती. 

राजेश खन्ना यांची लोकप्रियता त्या काळात इतकी होती की त्यांचे लग्न हे लाखो महिला चाहत्यांसाठी मोठा धक्का होता. या जोडप्याने 1982 पर्यंत एकत्र राहून पुढे वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर डिंपल कपाडिया यांनी चित्रपटसृष्टीत परतण्याचा निर्णय घेतला. डिंपल कपाडिया आणि राजेश खन्ना यांना ट्विंकल खन्ना आणि रिंकल खन्ना या दोन मुली आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

डिंपल आणि राजेश खन्ना यांच्या नात्याला जरी दीर्घकालीन यश लाभले नाही, तरी त्यांच्या लग्नाची चर्चा आजही कायम आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे हे फोटो त्याकाळातील मोहक क्षणांची आठवण करून देतात. चाहत्यांना त्यांच्या फॅशन, स्टाईल आणि व्यक्तिमत्त्वाची भुरळ आजही पडते.  

हा फोटो त्या काळातील बॉलिवूडचा सुवर्णकाळ दर्शवतो. तो काळ ज्या ठिकाणी स्टारडमची व्याख्या राजेश खन्ना यांनी रचली, तिथे डिंपल कपाडियाची सौंदर्य आणि मोहकता चाहत्यांच्या मनावर गारुड घालणारी होती.