मुंबई : अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियावर त्यांच्या बालपणीचे फोटो शेअर करत असतात. यातील काही असे आहेत की, ते सहज ओळखता येतात. मात्र यामध्ये अनेकांना ओळखणं फार कठीण जातं. आज आम्ही तुमच्यासाठी असाच एक फोटो घेऊन आलो आहोत. बालपणीच्या फोटोत दिसणारी सेलिब्रिटी ओळखणं तर दूरच, तिचं नाव जरी सांगितलं तरी विश्वास बसणार नाही.
तुम्ही या सेलिब्रिटीला ओळखण्यात अयशस्वी होण्याआधीच, आम्ही तुम्हाला काही सूचना देतो. ही सेलिब्रिटी आज फॅशन जगतात सर्वाधिक चर्चेत असलेलं नाव आहे. अगदी परदेशी फॅशन डिझायनर्सपासून ते रणवीर सिंगपर्यंत तिला फॅशन आयकॉनची पदवी दिली आहे. ही सेलिब्रिटी तिच्या कपड्यांवर कात्री वापरण्यासाठी ओळखली जाते. यासोबतच प्राण्यांचे शैल असो किंवा अॅल्युमिनियम फॉइल असो, या अभिनेत्रीला प्रत्येक गोष्टीत केवळ प्रायोगिक पेहराव दिसतो.
फॅशन एक्सपेरिमेंटसाठी प्रसिद्ध
असा इशारा देऊनही तुम्हाला समजत नसेल, तर आम्ही तुम्हाला सांगतो की, ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून फॅशन फ्रीक उर्फी जावेद आहे. उर्फी जावेद तिच्या नव-नवीन प्रयोगांसाठी प्रसिद्ध आहे. यासोबतच दररोज उर्फी तिच्या लूकसोबत काहीतरी नवीन करत घराबाहेर पडते आणि प्रत्येकजण तिच्या फोटोंची आतुरतेने वाट पाहत असतो.
खूप गोंडस दिसत आहे
उर्फी जावेदच्या या फोटोबद्दल बोलायचं झालं तर, या फोटोमध्ये उर्फी जावेद शाळेच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. पोनीमध्ये दिसणारी उर्फी हसताना खूप गोंडस दिसत आहे. हे फोटो उर्फीच्या शाळेच्या अल्बमसारखे दिसत आहेत. व्हायरल होत असलेल्या फोटोत उर्फीला ओळखणं फार कठीण आहे. तिच्या चाहत्यांसोबतच तिच्यासोबत काम करणारे स्टार्सही तिला या फोटोंमध्ये ओळखू शकले नाहीत.