'गेहराईया' या सिनेमांची कॉपी? का म्हटलं जातं असं...

'गेहराईया' सिनेमा आज रिलीज झाला आहे

Updated: Feb 11, 2022, 09:02 PM IST
'गेहराईया' या सिनेमांची कॉपी? का म्हटलं जातं असं... title=

मुंबई : दीपिका पदुकोण, सिद्धांत चतुर्वेदी, अनन्या पांडे आणि धैर्य करवा स्टारर 'गहराइयां' आज रिलीज झाला आहे. हा चित्रपट एडल्ट रिलेशनशिपवर आधारित आहे. गेहराईया या चित्रपटाची कथा अलीशा खन्ना (दीपिका पदुकोण), टिया खन्ना (अनन्या पांडे), झैन (सिद्धांत चतुर्वेदी) आणि करण अरोरा (धैर्य कर्वा) यांच्याभोवती फिरते. अलिशा आणि टिया या चुलत बहिणी आहेत. दोघांची आर्थिक परिस्थिती वेगळी आहे.

टिया आणि झैन रिलेशनशिपमध्ये आहेत. अलिशा आणि करणही रिलेशनशिपमध्ये आहेत. जेव्हा झैन आणि अलिशा एकमेकांना डेट करायला लागतात तेव्हा कथेला नवीन वळण मिळतं. त्यामुळे चौघांमध्ये अडचणी निर्माण होतात. बॉलीवूडमध्ये यापूर्वीही अशा स्क्रिप्टवर अनेक चित्रपट बनले आहेत. आम्ही तुम्हाला अशाच काही नात्यांवर आधारित चित्रपटांबद्दल आज सांगणार आहोत.

बॉलीवूड चित्रपटांमध्ये अनेकदा असे प्रेमसंबंध किंवा अशी विवाहित जोडपी दाखवली गेली आहेत जी एकत्र असूनही एकत्र नसतात. बॉलीवूड चित्रपटांमध्ये एक्स्ट्रा मैरिटल अफेयर ही नवीन संकल्पना नाही. अशा चित्रपटांमध्ये एक हॅपी एंडिंग असायचा आणि नवरा अनेकदा बायकोकडे परत यायचा. या संकल्पनेवर बीवी नंबर 1, हम दिल दे चुके सनम किंवा दिल धडकने दो सारखे चित्रपट बनवले गेले आहेत.

सिलसिला
हा त्या काळातील लोकप्रिय चित्रपटांपैकी एक आहे. सिलसिला हा यश चोप्राचा चित्रपट होता. अमिताभ बच्चन, रेखा, जया बच्चन, संजीव कुमार आणि शशी कपूर स्टारर सिलसिला हा त्या काळातील एक बोल्ड चित्रपट होता. 1981 मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटात विवाहित अमिताभ यांना त्यांची एक्स गर्लफ्रेंड चांदनीसोबत रिलेशनशिपमध्ये दाखवण्यात आलं होतं. या चित्रपटात रेखा आणि अमिताभ बच्चन यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडली होती.

बीवी नंबर 1
या चित्रपटात सलमान खान, करिश्मा कपूर, अनिल कपूर, तब्बू आणि सुष्मिता सेन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. पूजा म्हणजेच करिश्मा कपूर एक गृहिणी आहे. ती तिच्या पती आणि दोन मुलांसोबत राहते. मात्र, तिचा नवरा तिला एका सुंदर मॉडेल रुपालीसाठी सोडतो. मग ती तिचा नवरा शोधण्यासाठी स्वतःमध्ये बदल घडवून आणते आणि शेवटी तिचा नवरा त्याच्या गर्लफ्रेंडला सोडून तिच्याकडे परत येतो.