टप्पू नव्हे, तर 'या' व्यक्तीला डेटवर नेण्याचं बबीताकडून प्लॅनिंग सुरु

त्याचबरोबर या शोमधील प्रत्येक पात्रावर प्रेक्षकांच्या नजरा खिळल्या जातात,

Updated: Nov 2, 2021, 06:14 PM IST
 टप्पू नव्हे, तर 'या' व्यक्तीला डेटवर नेण्याचं बबीताकडून प्लॅनिंग सुरु  title=

मुंबई : कॉमेडी शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा'ची फॅन फॉलोइंग सातत्याने वाढत आहे. गेल्या 13 वर्षांपासून हा शो प्रेक्षकांचे केवळ मनोरंजनच करत नाही तर सर्वांची पहिली पसंती राहिला आहे. या शोमधील प्रत्येक पात्र त्याच्या खास फॅन फॉलोइंगसाठी ओळखले जाते.

त्याचबरोबर या शोमधील प्रत्येक पात्रावर प्रेक्षकांच्या नजरा खिळल्या जातात, पण जेव्हा 'बबिता जी' येते, तेव्हा काय बोलावे? 'बबिता जी' म्हणजेच मुनमुन दत्ता केवळ तिच्या अभिनयामुळेच नाही तर तिच्या सौंदर्य आणि हॉटनेसमुळेही चर्चेत आहे. त्याचवेळी, मुनमुन दत्ता या शोमध्ये 'टप्पू'ची भूमिका साकारणाऱ्या  राज अनादकटसोबतच्या अफेअरच्या बातम्यांमुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे.

मुनमुन आणि राज यांना सोशल मीडियावर खूप ट्रोल केले जात आहे. दरम्यान, आता मुनमुन दत्ताचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती एक नव्हे तर तीन लोकांसोबत डेटवर जाण्याविषयी बोलताना दिसत आहे. 

मुनमुन दत्ताचा व्हायरल व्हिडिओ त्याच्या एका फॅन पेजवर शेअर करण्यात आला आहे. त्याचा हा व्हिडिओ कुठल्यातरी फंक्शनचा असल्याचं दिसत आहे. यावेळी तिच्यासोबत दयाबेन म्हणजेच दिशा वाकाणी दिसत आहे. जेव्हा एका रिपोर्टने मुनमुन दत्ताला विचारले की, तुला कोणासोबत डेटवर जायचे आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

यावर मुनमुन हसली आणि लाजली आणि म्हणाली की, मला तीन लोकांसोबत डेटवर जायचे आहे. मुनमुन दत्ताने पहिले नाव सिद्धार्थ मल्होत्राचे घेतले. तर दुसरे नाव रणबीर कपूरचे आणि तिसरे नाव वरुण धवनचे होते. बबिता जी या तीन स्टार्ससोबत डेटवर जाण्याचे स्वप्न पाहत आहे. चाहत्यांना हा व्हिडीओ खूपच आवडला आहे.