स्वत:च्याच लग्नात कसली लाज; जेठालालच्या मुलीचा कोणता निर्णय ठरतोय आदर्श?

दिलीप जोशी यांच्या लेकीनं जिंकलं नेटकऱ्यांचं मन   

Updated: Dec 16, 2021, 10:57 AM IST
स्वत:च्याच लग्नात कसली लाज; जेठालालच्या मुलीचा कोणता निर्णय ठरतोय आदर्श?
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चश्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या मालिकेतील 'जेठालाल' म्हणजेच अभिनेतेर दिलीप जोशी यांच्या मुलीचा विवाहसोहळा नुकताच पार पडला. नियती, या त्यांच्या मोठ्या मुलीनं अतिशय शाही सोहळ्यामध्ये लग्नगाठ बांधली. 

यशोवर्धन मिश्रा असं तिच्या पतीचं नाव. जोशी यांनी स्वत: लेकिच्या लग्नानंतर काही खास क्षणांचे फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले. 

चित्रपटांमधील गोष्टी जेव्हा प्रत्यक्षात घडतात ते क्षण अतुलनीय असतात अशा आशयाचं कॅप्शन त्यांनी या फोटोंना दिलं. 

जोशी यांच्या फोटोंनी सर्वांचं लक्ष वेधलवं. कुठे कोणी त्यांच्या मुलीला आणि जावयाला शुभेच्छा देताना दिसलं, तर कुठे नियतीच्या एका निर्णयाचं कौतुक करताना. 

पांढऱ्या रंगाची साडी, लाल रंगाचं ब्लाऊज, साजेसा मेकअप आणि हेअरस्टाईल असा एकंदर नियतीचा लग्नातील लूक होता. तर, यशोवर्धननंही शेरवानीला पसंती देत रुबाबदार अंदाजात तो लग्मंडपात आला होता. 

नियतीच्या या रुपात सर्वकाही योग्य असतानाच तिच्या राखाडी/ पांढऱ्या केसांनी सर्वांचं लक्ष वेधलं. 

अनेकांनी तर, तिने केसांना राखा़डी रंग दिला आहे का असा प्रश्नही विचारला. 

लेकिची पाठवणी करताना 'जेठालाल' यांना अश्रू अनावर; पाहा ते भावनिक क्षण 

 

इथे लक्ष देण्याजोगी बाब म्हणजे नियतीनं तिचे अवेळी पांढरे होणारे केस न लपवण्याचा अर्थात ते न रंगवण्याचा निर्णय घेतला. स्वत:चीच लाज का वाटावी, अशाच आशयानं तिनं हा निर्णय घेतल्याचं पाहायला मिळालं होतं. 

सहसा लग्नाच्या दिवशी सुंदरतेचे निकष आणि परिभाषा वेगळ्या असतात. पण, नियतीनं या साऱ्या समजुतींना अतिशय सुरेखपणे शह दिल्याचं तिच्या एकंदर लूककडे पाहताना लक्षात येत होतं.