हिंदी चित्रपटांमध्ये काम करुनही भाषा येत नाही; बॉलिवूडकरांवर गायिकेची सणसणीत टीका

घराणेशाही, भाषावाद, प्रांतवाद अशा बऱ्या विषयांवरून कलाकारांमध्येही जुंपली. 

Updated: Jun 30, 2022, 12:23 PM IST
हिंदी चित्रपटांमध्ये काम करुनही भाषा येत नाही; बॉलिवूडकरांवर गायिकेची सणसणीत टीका  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : हिंदी कला जगतामध्ये गेल्या काही वर्षांपासून बरेच वाद चव्हाट्यावर आले आहेत. मुख्य म्हणजे या कलाजगतामध्येही दोन भाग पडले आहेत. घराणेशाही, भाषावाद, प्रांतवाद अशा बऱ्या विषयांवरून कलाकारांमध्येही जुंपली. 

आता म्हणे वादाला आणखी एक विषय मिळाला आहे. गायिका आणि संगीत दिग्दर्शिका सोना मोहापात्रा हिनं काही बी टाऊन सेलिब्रिटींवर निशाणार साधला आहे. तिनं अशा कलाकारांचा समाचार घेतला आहे, ज्यांना हिंदी कलाजगतात काम करुनही या भाषेत संभाषणही करता येत नाही. (Singer Sona Mohapatra Attack On Bollywood Stars on their lack knowlegde of Hindi language)

हिंदी भाषेवरील वादावर प्रतिक्रिया देताना सोनानं या कलाकारांवर टीका करत ही लज्जास्पद बाब असल्याचं म्हटलं. तिथे दाक्षिणात्य कलाकार मंडळी त्यांच्या संस्कृतीला अभिमानानं सादर करत आहेत. इथे हिंदी अभिनेते मात्र भाषाही बोलताना अडखळत आहेत. 

एका मुलाखतीदरम्यान सोनाला हिंदी डिबेट ( Hindi Language Debate) संबंधीत प्रश्न विचारण्यात आला. यावेळी तिनं आपण, 'RRR' आणि 'पुष्पा' हे चित्रपट पाहिल्यानंतर कल्ला केल्याचं सांगितलं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by SONA (@sonamohapatra)

बॉलिवूडची एकच बाब खटकते... 
बॉलिवूडमध्ये बरेच अप्रतिम कलाकार आहेत असं म्हणताना तिनं या कलाकारांना हिंदी भाषा बोलताना मात्र अडचणी येत असल्याचं म्हणत याचीच खंत व्यक्त केली. यावर स्पष्टीकरण देत ती म्हणाली, 'खंत यासाठी की तुम्ही हिंदी चित्रपटांमध्ये काम तर करता पण तुम्हाला हिंदी भाषा कशी येत नाही...'

गेल्या काही दिवसांपासून अभिनेता अजय देवगन आणि दाक्षिणात्य अभिनेता किचा सुदीप यांच्यामध्ये भाषेच्या मुद्द्यावरून जुंपली होती. पुढे बरेच कलाकार या वादात उडी घेताना दिसले.