मुंबई : बॉलिवूडमध्येही तीज-उत्सव थाटामाटात साजरा केला जातो. होळी असो की दिवाळी, या प्रसंगी सेलेब्स खुलेपणाने एन्जॉय करताना दिसतात. या वर्षी अनेक सेलिब्रिटींनी एका नवीन स्टाईलमध्ये ग्रँड दिवाळी पार्टी आयोजित केली आहे. ज्यामध्ये अभिनेत्री क्रिती सेनन आणि आयुष्मान खुराना यांचा समावेश आहे. दरम्यान, पंजाबी अभिनेत्री शहनाज गिलनेही धमाकेदार दिवाळी पार्टी करण्याचा निर्णय घेतला आहे. शहनाज यावर्षी तिची पहिली दिवाळी पार्टी आयोजित करण्यासाठी सज्ज आहे आणि ती खूप भव्य असणार आहे.
शहनाज या दिवशी ग्रँड दिवाळी पार्टी देणार आहे
'पंजाबची कतरिना कैफ' म्हणून ओळखली जाणारी शहनाज गिल या वर्षी तिची पहिली दिवाळी पार्टी मुंबईत देणार आहे. या पार्टीत बॉलिवूडचे बडे स्टार्स हजेरी लावणार आहेत. बॉलीवूडचा भाईजान सलमान खानलाही शहनाजच्या पार्टीसाठी आमंत्रित करण्यात आलं आहे. एका सूत्रानुसार, ''शहनाज 21 ऑक्टोबर 2022 रोजी दिवाळी पार्टी आयोजित करण्याची योजना आखत आहे आणि अभिनेत्रीने सलमान खानसह बॉलिवूडमधील अनेक जवळच्या मित्रांना आमंत्रित केलं आहे.
शहनाज लवकरच सलमान खानसोबत त्याच्या आगामी 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटात मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. अशा परिस्थितीत शहनाजने संपूर्ण खान कुटुंबाला पार्टीसाठी आमंत्रित केलं आहे, ज्यामध्ये सुपरस्टार सलमान देखील उपस्थित राहू शकतो.